Paithan Drought Situation | शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार विलास भुमरेंकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

पिकांची स्थिती, पाणीटंचाईच्या समस्यांचा घेतला आढावा; प्रशासनाला तत्काळ उपाययोजनांच्या सूचना
MLA Vilas Bhumre  Drought Inspection
MLA Vilas Bhumre Drought InspectionPudhari
Published on
Updated on

MLA Vilas Bhumre Drought Inspection

पैठण : पैठण तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार विलास भुमरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि शेतीसमोरील विविध अडचणी जाणून घेतल्या.

पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील अनेक भागांतील पिकांवर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भुमरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह शेतशिवारात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्या तसेच पिकांना आवश्यक असलेल्या पाण्याची उपलब्धता याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

MLA Vilas Bhumre  Drought Inspection
Paithan Crime News : गुप्तधनाच्या आमिषाने सराफाला बोलावले; दहा लाख लुटले

यावेळी खासदार संदिपान भुमरे यांनीही शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना आणि मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तहसीलदार ज्योती पवार, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड आणि सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आमदार विलास भुमरे म्हणाले, “महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”

MLA Vilas Bhumre  Drought Inspection
Paithan News : मंत्री अतुल सावे यांच्या कुटूंबातील सदस्यांना मारहाण : पोळ्याच्या दिवशी नायगाव - खंडेवाडीला छावणीचे स्वरूप!

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, पाण्याची उपलब्धता आणि अन्य प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. तसेच पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही भुमरे यांनी सांगितले.

यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, परिसरातील शेतकरी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळातही दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आमदार भुमरे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news