Paithan Crime News : गुप्तधनाच्या आमिषाने सराफाला बोलावले; दहा लाख लुटले

पाचोड पोलिसांकडून टोळी जेरबंद; मध्यस्थाच्या भूमिकेबाबत चर्चा
Paithan Crime News
Paithan Crime News : गुप्तधनाच्या आमिषाने सराफाला बोलावले; दहा लाख लुटलेfile photo
Published on
Updated on

Goldsmith lured with promise of hidden treasure; robbed of ten lakhs

पैठण, पुढारी वृत्तसेवा : सोन्याचे गुप्तधन विक्री करण्याच्या बहाण्याने मध्यप्रदेशातील सराफा व्यापाऱ्याला पैठण तालुक्यातील वडजी शिवारात बोलावून त्याला मारहाण करत दहा लाख रुपये लुटणाऱ्या टोळीला पाचोड पोलिसांनी जेरबंद केले.

Paithan Crime News
Marathwada Mukti Sangram Din : शाळांमध्ये मुक्तिसंग्राम दिन साजरा

मध्यप्रदेशातील सिधी जिल्ह्यातील रमाशंकर लालूप्रसाद सोनी (वय ४६) हे सोन्या-चांदीचे व्यापारी आहेत. मंगळवारी (दि. १५) सकाळी साडेअकराच्या सुमारास मध्यस्थामार्फत गुप्तधनातील सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ते वडजी शिवारात आले होते. यावेळी टोळीने त्यांना ४०० ग्रॅम सोन्याच्या बनावट टिकल्या दाखवून त्यांच्या पिशवीतील दहा लाख रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर कुऱ्हाड व लोखंडी रॉडने मारहाण करून आरोपी पसार झाले.

याप्रकरणी सोनी यांच्या तक्रारीवरून प्रकाश आयजी चव्हाण, नर्मदा आयजी चव्हाण, आयबी आयजी चव्हाण, विक्रम आयजी चव्हाण, आकाश आयजी चव्हाण (सर्व रा. वडजी) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि सचिन पंडित व विहामांडवा पोलिस चौकीचे उपनिरीक्षक श्रीहरीविजय बोबडे यांच्या विश्लेषणाच्या आधारे आरोपींन जेरबंद केले. लुटीतील मुद्देमात हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Paithan Crime News
Maratha reservation : मराठा आरक्षण शासनादेशात दुरुस्ती करून ओबीसीसारख्या सर्व सवलती द्या !

मध्यस्थ कोण ?

स्वस्तात सोन्याचे गुप्तधनातील दागिने मिळण्याच्या आमिषाने व्यापारी थेट मध्यप्रदेशातून मध्यस्थामार्फत पैठण तालुक्यात आला. त्यामुळे या मध्यस्थाचा आरोपी टोळीशी काही संबंध आहे का, तसेच तो नेमका कोण आहे, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news