Sambhajinagar News : फौजदाराच्या अंगावर घातले वाहन; गुन्हा दाखल

कर्तव्यावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: Vehicle driven at police sub-inspector; case registered

मंठा, पुढारी वृत्तसेवा : कर्तव्यावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवार, दि.१० रोजी रात्री ७.१६ वाजताच्या सुमारास तळणी फाटा येथील सुरज जिनिंग येथे घडली. यात पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले आहे.

Crime News
Water New Scheme : नवीन योजनेचे पाणी दाखल, नळ कोरडेच

पोलिस उपनिरीक्षक इंद्रल हरिश्चंद्र राठोड, वय ५६ वर्षे हे मंठा यांनी या संदर्भात तक्रार दिली. त्यानुसार ते तळणी फाटा येथे कर्तव्यावर होते. आरोपी दीपक गुलाबराव मोरे, रा. देवठाणा, ता. मंठा हा त्याच्या ताब्यातील पिकअप वाहन क्रमांक एम. एच.०५, ई.एल. ९९२६ मंठा ते जालना रोडवरून अपघात करून पळून जात असल्याचे पोउनी राठोड यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करून वाहन पोलिस ठाण्यात घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी आरोपी मोरे यांने पीकअप वाहन पोउनि. राठोड यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर वाहन घातले. यात राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Crime News
Tiranga Rally : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज तिरंगा रॅली

शिवाय, त्यांच्या दुचाकीचे नुकसान करून आरोपी पळून गेला. या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक देशमुख करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news