Sambhajinagar News : 'त्या' महिलेचा मडके विकून नव्हे भीक मागूनच उदरनिर्वाह

मनपाकडून निर्वाह भत्त्यासाठी मदतीचे आश्वासन : अतिक्रमण कारवाईप्रकरणी प्रशासनाचे स्पष्टीकरण
Sambhajinagar News
Sambhajinagar News : 'त्या' महिलेचा मडके विकून नव्हे भीक मागूनच उदरनिर्वाहfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: 'That' Woman Sustains Herself Not by Selling Pots, But Solely by Begging

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान दिव्यांग महिलेची मडकी फोडून तिचा उदरनिर्वाह हिरावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर महापालिका प्रशासनाने रविवारी (दि.१०) स्पष्टीकरण दिले. संबंधित दिव्यांग महिला मडकी विक्री करत नसून मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती तिच्या बहिणीने प्रशासनासमोर दिली. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तर संबंधित महिलेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : मोती कारंजा ते समर्थनगर नाल्यांची सभापतींकडून पाहणी

महापालिकेकडून हटवण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईत ज्या दिव्यांग महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या अर्चना पाखरे या भारतनगर भागात आपल्या बहिणीसह वास्तव्यास आहेत. दरम्यान काही वर्षांपूर्वी वीजेचा धक्का बसल्याने त्या दिव्यांग झाल्या असून त्यांना बोलताही येत नाही. तसेच पतीच्या निधनानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांच्या दोन मुलींना अनाथाश्रमात ठेवण्याची वेळ कुटुंबावर आली. सध्या त्या गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र अतिक्रमण कारवाईदरम्यान त्यांच्या मडक्यांचे नुकसान झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या घटनेनंतर विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी प्रशासनावर टीका केली. आमदार बच्चू कडू यांनीही संबंधित महिलेची भेट घेऊन प्रशासनाने दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे म्हटले.

Sambhajinagar News
Sambhajinagar Death Case Update: 2009 पासूनचे संबंध, 36 लाखांची वसुली... एकत्र राहण्याचा अट्टाहास; पत्नीचा गेला नाहक बळी

त्यानंतर रविवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करत संबंधित महिला मडकी विक्री करत नसून मंदिर परिसरात भीक मागत असल्याचे सांगितले. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यामुळे सेव्हनहिल परिसरातील कारवाई करण्यात आल्याचा दावा केला. तसेच कारवाईपूर्वी संबंधितांना सूचना देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. रविवारी महापालिका आयुक्त अमोल येडगे व अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांनी संबंधित महिलेची भेट घेऊन कुटुंबीयांशी चर्चा केली.

महापालिका करणार गुन्हा दाखल

या कारवाईची बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर जो चुकीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्यात एक दिव्यांग महिलेला फुटलेले माठ उचलताना दाखवून, तिचा उदरनिर्वाह माठ विक्रीवर अवलंबून होता. त्यामुळे महापालिकेने तिच्यावर अन्याय केला असा चुकीचा संदेश प्रसारित करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

निर्वाह भत्त्यासाठी मदतीचा हात

महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांनी रविवारी गजानन महाराज मंदिर परिसरात जाऊन दिव्यांग महिला व तिच्या बहिणीशी चर्चा केली, यावेळी दिव्यांग महिलेच्या निर्वाहासाठी शासनाच्या योजनेतून दरमहा साडेतीन हजार रुपयांचा निर्वाह भत्ता मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन वाहुळे यांनी दिले. तसेच आवश्यक कागदपत्रांसह सोमवारी महापालिका मुख्यालयात येऊन आयुक्तांची भेट घेण्यास सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news