Sambhajinagar Gunthewari News : मनपाने ५० टक्के शुल्क सवलत देताच गुंठेवारीसाठी गर्दी

दोन दिवसांत २० प्रस्ताव दाखल
Sambhajinagar News
Sambhajinagar News : मनपाने ५० टक्के शुल्क सवलत देताच गुंठेवारीसाठी गर्दीFile Photo
Published on
Updated on

Sambhajinagar News : Rush for Gunthewari as soon as municipality gives 50 percent fee discount

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने गुंठेवारी नियमितीकरणासाठी पुन्हा एकदा ५० टक्के शुल्क सवलत दिली आहे. तसा ठराव नुकत्याच झालेल्या महापालिका सभेत मंजूर झाला असून तीन महिनेच ही शुल्क सवलत मिळणार असल्याने बेकायदा बांधकामधारकांनी महापालिकेच्या टप्पा क्रमांक ३ मधील गुंठेवारी विभागात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत शंभरहून अधिक जणांनी विचारणा करुन २० हून अधिक अर्ज दाखल केले.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : वाळूजमधील उद्योगांनी गुंठेवारी नियमित करून घ्यावी : जी श्रीकांत

शहरातील बेकायदा बांधकामे गुंठेवारी कायद्यान्वये नियमित करण्यासाठी महापालिकेला शासनाने २००५ सालीच मंजूरी दिली होती. परंतु, शहरात बहुतांश बेकायदा बांधकाम हे २००५ ते २०२० सालापर्यंत झाले आहेत. त्यामुळे शासनाने नियमितीकरणासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या बांधकामांना योजनेत समाविष्ट करावे, अशी मागणी युतीच्या त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली होती.

त्यावरून शासनाने गुंठेवारीच्या कायद्यात सुधारणा करून २०२० सालापर्यंतच्या मालमत्तांना लागू केला. यानुसार २०२१ ते २०२३ सालापर्यंत गुंठेवारीच्या शुल्कामध्ये महापालिकेने ५० टक्के सवलत दिली होती. दरम्यान, दीड वर्षात १२० कोटींचा महसुल जमा झाला होता. तसेच प्रशासक जी. श्रीकांत यांनीही दोन वेळा ५० टक्के शुल्क सवलत दिली होती.

Sambhajinagar News
परभणी जिल्ह्यात तापणार 'ग्राम'राजकारण

त्यातून सुमारे ५० कोटींहून अधिकचा महसूल जमा झाला होता. आता पुन्हा एकदा महापालिकेने गुंठेवारीसाठी बेटरमेंट चार्जमध्ये ५० टक्के शुल्क सवलतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून गुंठेवारी विभागात विचारणा करणाऱ्यांनी गर्दी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासोबतच २० हून अधिक जणांनी प्रस्तावही दाखल केले.

अशी असेल सवलत

या निर्णयानुसार १५ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करणाऱ्यांना बेटरमेंट चार्जेसमध्ये ५० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तर १६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर यादरम्यान अर्ज करणाऱ्यांना २५ टक्के सवलत दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news