Sambhajinagar News : वाळूजमधील उद्योगांनी गुंठेवारी नियमित करून घ्यावी : जी श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील नागरिकांना कमी दरात बेटरमेंट चार्जेस भरून गुंठेवारी नियमित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : file photo
Published on
Updated on

Industries in Waluj should regularize their Gunthewari properties: G. Srikant

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील नागरिकांना कमी दरात बेटरमेंट चार्जेस भरून गुंठेवारी नियमित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, वाळूज औद्योगिक परिसरातील उद्योजकांनीही त्यांच्या जमिनी व बांधकामे दिलेल्या मुदतीत नियमित करून घ्यावीत, असे आवाहन महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.

Sambhajinagar News
वाळूज परिसरातील अ-नागरी जमिनी आता नागरी झोनमध्ये!

वाळूज येथील मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (मासिआ) कार्यालयात शुक्रवारी आयोजित गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सहआयुक्त अंजली धानोरकर, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी साधना बांगर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

पुढे जी. श्रीकांत म्हणाले, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असून, शासन नियमांनुसार ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचीच विनापरवाना बांधकामे नियमित करुन त्यानंतरची बांधकामे हटविण्यात येतील. अभय योजनेंतर्गत १ मे ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत बेटरमेंट चार्जेसवर १० टक्के शुल्क आकारले जाईल.

Sambhajinagar News
Beed News : बीडला उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करा

त्यानंतर १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ५० टक्के शुल्क आकारले जाईल, तर १ नोव्हेंबर २०२६ पासून पूर्ण शुल्क आकारण्यात येणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले.

उद्योजकांनी फक्त मॅसेज करावा, समाजकंटकांवर कारवाई

उद्योजकांच्या शंकांचे निरसन व अर्ज स्वीकृतीसाठी मसिआ कार्यालयात सीएमआडीएच्या अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच समाजकंटकांकडून त्रास होत असल्यास उद्योजकांनी केवळ संदेशाद्वारे तक्रार करावी, संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news