Sambhajinagar News : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

जांभरुण : पाच जणांवर गुन्हा, दुचाकी व रोकड जप्त
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाडfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: Police Raid on Gambling Den

तळणी, पुढारी वृत्तसेवा मंठा तालुक्यातील जांभरुण शिवारात आंब्याच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंठा पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, जुगार साहित्य आणि विविध कंपनीच्या मोटारसायकली असा ३ लाख ८६हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Sambhajinagar News
Latur Crime | जळकोट पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई; दोन हायवा टिपरसह 50.50 लाखांचा मुद्देमाल जप्त!

पोलीस ठाण्यात संतोष बाबुराव बनकर यांच्या फिर्यादीवरून करण्यात आलेल्या कारवाईत जांभरून (ता. मंठा) येथील शेत शिवारातील मोकळ्या जागेत आरोपी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून विजय बबीराम राठोड, संदीप प्रल्हाद चव्हाण, रमेश हरी चव्हाण, सचिन आसाराम चव्हाण, राहुल नारायण चव्हाण (सर्व रा. दहा, ता. मंठा, जि. जालना) यांना ताब्यात घेतले याशिवाय दुचाकी चालकांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग सिंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या पथकाने केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, पोलीस जमादार रखमार्ज मुंढे, विलास कातकडे, संतोष बनकर आसाराम मदने यांनी केली.

Sambhajinagar News
Jalna crime | रांजणीत पोलिसांची मोठी कारवाई; पावणेदोन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

३ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी ६ हजार १०० रुपयांची रोकड तसेच ३ लाख ८० हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या दुचाकी आणि ५२ पत्त्यांचे दोन कॅट जप्त केले. या कारवाईत ३लाख ८६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news