Sambhajinagar News : तब्बल तीन महिन्यांनंतर कबुतराची त्रासातून मुक्तता

पायात नायलॉन मांजा आणि बाटलीचे झाकण अडकल्याने त्रास सहन करणाऱ्या कबुतराला तब्बल तीन महिन्यांनंतर दिलासा मिळाला.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : तब्बल तीन महिन्यांनंतर कबुतराची त्रासातून मुक्तताfile photo
Published on: 
Updated on: 

Sambhajinagar News: Pigeon finally freed from its ordeal after three long months

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पायात नायलॉन मांजा आणि बाटलीचे झाकण अडकल्याने त्रास सहन करणाऱ्या कबुतराला तब्बल तीन महिन्यांनंतर लाईफ केअर अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला असून त्या मुक्या प्राण्यांची त्रासातून सुटका करण्यात आली.

Sambhajinagar News
Short Circuit Fire : शॉर्टसर्किटमुळे हळदा येथे घराला आग; घरासह किराणा दुकान जळून खाक

घराच्या बाल्कनीत कबुतराने पिल्ले पदमपुरा परिसरात एका दिले होते. ते कबुतर पिलांचा सांभाळ करण्यासाठी चारा आणल्यानंतर एकाच पायावर थांबत असल्याने तेथील राम रोठे यांच्या निदर्शनास आले. तब्बल तीन महिने कबुतर एकाच पायावर थांबत असल्याने त्यांनी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या पायात नायलॉन मांजा आणि बाटलीचे झाकण अडकल्याचे दिसून आले. ही बाब निदर्शनास येताच रोठे यांनी लाईफ केअर अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनचे जयेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला.

Sambhajinagar News
मुकुंदवाडीत चाचणीवेळी २००० च्या जलवाहिनीला लागली गळती

कबुतराची त्रासातून मुक्तता

त्या कबुतराला पकडून शिंदे यांनी त्यांचे सहकारी राहुल लोदे यांच्या मदतीने कबुतराच्या पायातील मांजा आणि प्लास्टिकचे झाकण काढले. त्यानंतर त्या कबुतराला चार पिलांचा सांभाळ करण्यासाठी परत सोडून दिले. अनेक महिन्यांपासून त्रास सहन करणाऱ्या कबुतराची शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्रासातून मुक्तता केली. या कार्यासाठी नितीन सुकासे, श्रीकांत जोगदंडे, सोमनाथ झेंडे, यांनीही मोलाचे सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.