Sambhajinagar News : नागेश्वरवाडीने अडविले निरालाबाजार, समर्थनगरचे पाणी

जलकुंभाहून स्वतंत्र जलवाहिनी, १५ वर्षांपासून व्हॉल्व्ह टाकण्याकडे दुर्लक्ष
नागेश्वरवाडीने अडविले निरालाबाजार, समर्थनगरचे पाणी
नागेश्वरवाडीने अडविले निरालाबाजार, समर्थनगरचे पाणीfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: Nageshwarwadi blocks water supply to Nirala Bazar and Samarth Nagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रत्येक वसाहतींना समान पाणीपुरवठा व्हावा यासाठी महापालिका पाणीपुरवठा विभागाने आवश्यक ठिकाणी व्हॉल्व्ह बवसिणे, क्रॉसकनेक्शन घेण्याचे काम सुरू केले आहे. यात १५ वर्षांपूर्वी जलकुंभ ते नागेश्वरवाडीपर्यंत टाकण्यात आलेल्या स्वातंत्र जलवाहिनीवर व्हॉल्व्हच बसविला नाही. त्यामुळे निरालाबाजार, समर्थनगरातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, आता पुन्हा एकदा या व्हॉल्व्ह बसविण्यावरून वसाहती-वसाहतींमध्ये वाद सुरू झाले आहेत.

नागेश्वरवाडीने अडविले निरालाबाजार, समर्थनगरचे पाणी
New water supply scheme : नव्या योजनेतून तीन दिवसांत शहराला ७८ दशलक्ष लिटर पाणी

महापालिकेने नागेश्वरवाडी, निराला बाजार, समर्थनगर या वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वातंत्र जलवाहिनी टाकली आहे. परंतू प्रत्यक्षात प्रत्येक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेले व्हॉल्व्ह बसविले. त्याचा फटका मागील १५ वर्षांपासून समर्थनगर आणि निरालाबाजारच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागेश्वरवाडी परिसर सखल भागात मोडत असल्याने गुरुत्वाकर्षनामुळे या भागाला सर्वाधिक पाणी मिळत आहे. ज्या दिवशी या भागातील पाण्याचा टप्पा असतो, त्या दिवशी सकाळीपासून संध्याकाळपर्यंत तब्बल १२ तास नागेश्वरवाडीला पाणी मिळते. परंतु निरालाबाजार आणि समर्थनगरला अतिशय कमी दाबावे पाणी उपलब्ध होते.

दरम्यान, या सर्व वसाहतींनाही समान पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाणीपुरवठा विभागाने नागेश्वरवाडीत व्हॉल्व्ह बसविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तिन्ही वसाहतींना चार-चार तास पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार नियोजन करण्यात आले. परंतु या निर्णयाला भाजपच्या नगरसेविका कीर्ती शिंदे यांनीच विरोध केला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्व वसाहतींना समान पाणी उपलब्ध व्हावे यासाठी घेतलेल्या निर्णयाला खुद्द भाजपच्याच नगरसेविकेने विरोध केल्याने आश्चर्य होत आहे. आता नागेश्वरवाडीप्रमाणेच समर्थनगर, निरालाबाजारमधील नागरिकही एकजूट झाले असून त्यांनीही व्हॉल्व्हच्या समर्थनार्थ दंड थोपाटले आहे.

नागेश्वरवाडीने अडविले निरालाबाजार, समर्थनगरचे पाणी
Sambhajinagar water supply : वाढीव 18 एमएलडी पाणी कुठे मुरतेय ?

तीन वर्षांपासून व्हॉल्व्ह पडून

वसाहतींच्या समान पाणी वाटपासाठी यापूर्वी अनेकवेळा या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसिवण्याची तयारी महापालिकेने केली होती. त्यासाठी व्हॉल्व्हही खरेदी करण्यात आला होता. परंतु नागेश्वरवाडीच्या नगरसेविका कीर्ती शिंदे यांच्या विरोधामुळे मागील तीन वर्षांपासून हा व्हॉल्व्ह धूळखात पडून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news