Sambhajinagar News : आ. अंबादास दानवेंनी आघाडी धर्म पाळला नाही : खा. काळेंची टीका

जिल्हा बँक निवडणुकीत मविआ पॅनलच्या पराभवाचे फोडले खापर
Sambhajinagar News
Sambhajinagar News : आ. अंबादास दानवेंनी आघाडी धर्म पाळला नाही : खा. काळेंची टीकाfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: MP Kale criticizes MLA Ambadas Danve

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलने २० पैकी १८ जागा जिंकत मविआच्या पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवला. उद्धव सेनेचे आ. अंबादास दानवे हे महायुतीच्या पॅनलकडून विजयी झाले. त्यामुळे दानवे यांनी आघाडी धर्म पाळला नाही, अशी टीका कॉग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली. याबाबत पक्षश्रेष्ठींनाही असल्याचेही ते म्हणाले.

Sambhajinagar News
District Bank Elections : जिल्हा बँकेवर महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

जिल्हा बँकेच्या नवीन संचालक मंडळ निवडीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली, तर रविवारी जिल्हा बँकेच्या सभागृहातच मतमोजणी होऊन निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी निकाल जाहीर केले. यात महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व स्पष्ट झाले. भाजपचे ६, शिवसेना शिंदे गट ९ आणि राष्ट्रवादीचे २, असे १७ उमेदवार निवडून आले.

महायुतीच्याच पॅनलकडून निवडणूक लढवत आ. दानवेही विजयी ठरले. तर दुसरीकडे खा. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखालील मविआच्या भूमिपुत्र शेतकरी सहकार बँक बचाव पॅनलकडून एकमेव खा. काळेच विजयी ठरले.

Sambhajinagar News
Nanded DCC Bank Election : वि.प.निवडणूक प्रक्रिया संपताच जिल्हा बँक निवडणुकीची घोषणा?

इतर सर्व उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे याबाबत माध्यमांशी बोलताना खा. काळे यांनी दानवेंनी आघाडी धर्म पाळला नाही. राज्यात शिवसेना ठाकरे गट, कॉग्रेस व राष्ट्रवादी (श.प.) यांची महाविकास आघाडी आहे. मात्र दानवे यांनी बँकेच्या निवडणुकीत विरोधी गटाकडून निवडणूक लढवली. जिल्ह्यात मोठा प्रचारही केला, याचा फटका मविआच्या पॅनलला बसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news