Sambhajinagar News : जिल्ह्यात मंत्री सावे, सत्तार, भुमरे पिता-पुत्र किंगमेकरच

मंत्री शिरसाट यांची बालेकिल्ल्यात पुन्हा नामुश्की
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जिल्ह्यात मंत्री सावे, सत्तार, भुमरे पिता-पुत्र किंगमेकरचfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar News : Minister Save, Sattar, Bhumre are father-son kingmakers in the district

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही आपापले गड राखत पैठण, सिल्लोड, सोयगावामध्ये पुन्हा एकदा खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार हेच किंगमेकर ठरले आहेत. तर दुसरीकडे नगरपरिषदेतील निसटत्या यशानंतर विशेष प्रयत्न करीत गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे आणि फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनाही जिल्हा परिषदेत गड राखण्यात यश आले. मात्र कन्नडच्या आमदार संजना जाधव यांना गड राखता आले नाही.

Sambhajinagar News
पवननगरात घर फोडून २५ तोळे सोने लंपास

त्यासोबतच महापालिका, नगरपरिषद आणि आता जिल्हा परिषदेतही पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर बालेकिल्ला राखण्यात नामुश्कीच ओढावली आहे. तर दुसरीकडे महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद काबीज करीत मंत्री अतुल सावे यांनी सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. पालकमंत्री शिरसाट यांच्यावर नामुश्की छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, येथील ९ पैकी ६ विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचेच आमदार आहेत. तर उर्वरित ३ आमदार भाजपचे आहेत. त्यामुळेच पालकमंत्री पद शिवसेनेकडे आहे. मात्र असे असतानाही पालकमंत्री संजय शिरसाट यांना नगरपालिका, नगरपंचायतच काय तर महापालिका आणि जिल्हा परिषदही राखता आली नाही. जिल्हा परिषेदत स्वतःच्या मतदारसंघात एकही गटावर विजय मिळवता आला नाही.

मनपानंतर जि.प.तही मंत्री सावेच

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने करिश्मा दाखविला आहे. महापालिका निवडणुकीत ११५ पैकी तब्बल ५७ नगरसेवक तर जिल्हा परिषदेत ६३ पैकी तब्बल २४ जागांवर विजय मिळवत अतिशय यशस्वी रणनीती आखून पुन्हा एकदा मंत्री अतुल सावे यांनी यश संपादन केले. या यशामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

Sambhajinagar News
ZP Election : संभाजीनगरात शिवसेना- भाजप युतीचा झेंडा

आ. बंब यांनी राखला गड

नगरपालिका निवडणुकीत खुलातबाद हातून गेल्यानंतर आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेत यशस्वी रणनीती आखली. त्या जोरावरच त्यांनी गंगापूर पाठोपाठ खुलताबादेतील ११ पैकी ७ गट राखून गड काबीज केला.

अटीतटीत आ. बोरणारेंची सरशी

वैजापूरमध्ये शिवसेनेचे आमदार असतानाही नगरपालिकेवर भाजपने सत्ता काबीज केली. त्यामुळे आमदार रमेश बोरणारे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत गाफील न राहता अटीतटीच्या लढतीत ८ पैकी ३ गट राखत सरशी मिळवीली. तर भाजपला १ आणि उबाठाला २ गटावर यश मिळाले.

आ. सत्तार यांचा करिश्मा कायम

सिल्लोड-सोयगाव हा विधानसभेचा गड निर्विवादपणे आमदार अब्दुल सत्तार यांच्याच ताब्यात असतो. मग येथील नगरपरिषद असो, ग्रामपंचायत असो की, जिल्हा परिषद असो. या तिन्ही निवडणुकीत सत्तार यांचाच करिश्मा कायम राहिला आहे. यंदाही जिल्हा परिषदेत त्यांनी १३ पैकी ६ गट राखून पुन्हा वर्चस्व कायम ठेवले.

पैठणमध्ये खा. भुमरेच नंबर वन

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री खासदार संदीपान भुमरे यांनी विधानसभा, नगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतही पैठणमध्ये आपले प्राबल्य कायम ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीत मुलगा विलास भुमरे यांना निवडून आले. त्यानंतर नगरपालिकेतही एकहाती सत्ता मिळवली आणि आता जिल्हा परिषदेत ९ पैकी ८ गट राखून किंगमेकर ठरले आहेत.

आ. चव्हाण यांनी मारली बाजी

नगरपालिकेच्या निवडणुकीतील अपयशावर अभ्यास करीत आमदार अनुर-ाधा चव्हाण यांनी उमेदवार देण्यापासून तर सर्वच गोष्टीत लक्ष घातले. त्यांच्या या रणनीतीमुळेच फुलंब्री मतदारसंघातील ४ पैकी ३ गटात बाजी मारली

आ. जाधव यांना अपयशच

कन्नड तालुक्यावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. विधानसभाच नव्हे तर नगरपालिकाही सेनेच्याच ताब्यात होती. परंतु यंदा नगरपालिकेनंतर जिल्हा परिषद-`तही आमदार संजना जाधव यांना गड राखता आला नाही. सेनेच्या विभाजनामुळे भाजपने ४, तर शिवसेना २ आणि उबाठाला २ गट मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news