Sambhajinagar News : जिल्हाधिकाऱ्यांकडून शिऊर महसूल मंडळातील शासकीय कामांचा आढावा

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शुक्रवारी (दि.१०) वैजापूर तालुक्याचा धावता दौरा करून शिऊर महसूल मंडळातील विविध शासकीय कामांचा आढावा घेतला.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जिल्हाधिकाऱ्यांकडून शिऊर महसूल मंडळातील शासकीय कामांचा आढावाfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: District Collector reviews government work in the Shiur revenue circle

शिऊर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शुक्रवारी (दि.१०) वैजापूर तालुक्याचा धावता दौरा करून शिऊर महसूल मंडळातील विविध शासकीय कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच विशेष मतदार संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Sambhajinagar News
Voter Verification : घरोघरी जाऊन होणार मतदारांची पडताळणी

शिऊर मंडळ कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी गौडा यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विशेष मतदार संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी उपस्थित नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. बैठकीपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे यांनी शिऊर महसूल मंडळाचे विस्तीर्ण क्षेत्र लक्षात घेता शिऊर, गारज व लोणी या तीन मंडळांसाठी स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याची मागणी केली.

Sambhajinagar News
Parbhani news : जिल्हा परिषदेत नियमबाह्य पदोन्नतीचा फुगा फुटला

त्यामुळे शेतकरी व नागरिकांना वैजापूरला वारंवार जावे लागणार नाही आणि महसुली कामांचा स्थानिक पातळीवरच निपटारा होईल, असे त्यांन जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. या दौऱ्यात उपजिल्हाधिकारी अरुण जन्हाड, तहसीलदार सुनील सावंत, मंडळ्ळ अधिकारी कुसनुरे, तलाठी जितेंद्र कळसकर यांच्यासह ग्रा.पं. सदस्य नंदकिशोर जाधव, जाकीर सय्यद, अनिल् भोसले, तसेच विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news