

Sambhajinagar News: Diesel Shortage Deals Major Blow to Municipal Water Tanker Service; Citizens Express Intense Outrage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहरातील वाढत्या डिझेल टंचाईचा फटका आता थेट महानगरपालिकेच्या पाणीटँकर सेवेलाही बसत असल्याचे समोर आले आहे. इंधन उपलब्ध होत नसल्यामुळे टैंकर वेळेत भरून पाडण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत असून, शहराच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा उशिराने होत आहे. वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे संतप्त नागरिकांचा रोष टँकर चालक आणि कर्मचाऱ्यांवर निघत आहे.
महानगरपालिकेकडून मनो-नेटवर्कफ तसेच तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहरातील २६ भागांमध्ये सध्या ८४ टँकरच्या माध्यमातून दररोज सुमारे २५० ते ३०० फेऱ्या केल्या जात आहेत. मात्र, टँकरमधील बिघाड, चालकांची अनुपस्थिती आणि आता त्यात डिझेलची भर पडल्यामुळे संपूर्ण पाणीप-रवठा यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
खासगी टँकरसाठी तीन-चार दिवसांची प्रतीक्षा
शहरातील मनपाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने आणि पाण्याचा मगॅपफ कायम असल्यामुळे शहरवासीय नाइलाजास्तव खासगी टँकरचा सहारा घेत आहेत. मात्र, या परिस्थितीचा गैरफायदा घेत खासगी टँकर चालकांकडून अव्वाच्या सव्वा दराने पाणी विक्री सुरू आहे. भरमसाठ पैसे मोजूनही अनेक नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी तीन-चार दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
डिझेलसाठी टँकरच्या रांगा
शहरातील एन-५, एन-७, समतानगर आणि नक्षत्रवाडी येथील केंद्रांवरून मनपाचे टँकर भरले जातात. या टैंकर सेवेसाठी दररोज सुमारे चार हजार लीटर डिझेलची आवश्यकता भासते. मात्र, सध्या पेट्रोल पंपांवर अत्यंत मर्यादित इंधन उपलब्ध होत असल्यामुळे टँकरचालकांना डिझेलसाठी तासंतास रांगेत थांबावे लागत आहे. परिणामी, नागरिकांनी आधीच बुकिंग करूनही त्यांना वेळेवर पाणी मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे. शहरातील अनेक पंपांवर मनो स्टॉकफ्चे फलक झळकत असून डिझेल केवळ मर्यादित प्रमाणात दिले जात आहे