Sambhajinagar News : दुबार कर आकारणीमुळे अडकले तब्बल ३०० कोटी

मनपाचे शेकडो मालमत्तांच्या सुनावणीकडे दुर्लक्ष, कर वसुली अडचणीत
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : दुबार कर आकारणीमुळे अडकले तब्बल ३०० कोटीFile Photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: A Staggering ₹300 Crore Held Up Due to Double Taxation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात शेकडो मालमत्तांना दुबार कर आकारणी झाली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून या मालमत्ताधारकांनी कर भरणा केला नसून आता त्यांच्याकडील कर थकबाकीचा आकडा तब्बल ३०० कोटींच्या जवळ गेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे यंदातरी प्रशासन या मालमत्ताधारकांची सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar
महसुलची मराठवाड्यात ८७५ कोटींची वसुली

महापौर समीर राजूरकर, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी देखील यासाठी पुढाकार घेतला असून कर वसुली वाढावी, यासाठी झोन कार्यालयनिहाय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन वसुलीबाबत मार्गदर्शन करीत आहेत.

सभापती मकरिये यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बैठक घेऊन उपायुक्त विकास नवाळे यांना दुबार कर आकारणी झालेल्या मालमत्तांचा सोक्षमोक्ष लावण्याचे आदेश दिले होते. तसेच कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून त्यांना नियमानुसार कर आकारणी करण्याची सूचना देखील केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : मोती कारंजा ते समर्थनगर नाल्यांची सभापतींकडून पाहणी

दोन दिवसांपूर्वीच महापौर राजूरकर आणि सभापती मकरिये यांनी कर वसुलीसाठी वेगवेगळ्या बैठका घेऊन अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला होता. दरम्यान, शहरात शेकडो मालमत्ता अशा आहेत की, ज्यांना दुबार कर आकारणी झाल्याने त्यांच्याकडून वसुलीच झालेली नाही. या मालमत्तांकडे तब्बल २८० ते ३०० कोटींच्या जवळपास कर थकला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news