Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने मेडिकल चालकाला भोसकले

सराईत त्रिकुटाला पुंडलिकनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Crime News
Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने मेडिकल चालकाला भोसकलेfile photo
Published on: 
Updated on: 

Sambhajinagar Medical shop operator stabbed for refusing money for alcohol

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दारू पिण्यासाठी पैसे आरोपी कार्तीक बामणे आरोपी विजय जगताप आरोपी वैभव शिंदे डोक्यात खुर्ची घालून पोटात चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता दुकानाच्या गल्ल्यातील १ हजार २०० रुपयांची रोकड लुटून परिसरात दहशत माजवली. ही थरारक घटना शनिवारी (दि. १०) दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन ते जय भवानी नगर रस्त्यावर घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Crime News
Anti-encroachment campaign : महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेचा धडाका

वैभव गजानन शिंदे (२४), विजय राजेंद्र जगताप (२५) आणि कार्तीक प्रकाश बामणे (१८, तिघेही रा. जयभवानीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने तिघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांनी दिली.

देण्यास नकार दिल्याने आम्ही या एरियाचे डॉन आहोत अशी धमकी देत तिघा गुंडांनी एका मेडिकल चालकाच्या फिर्यादी मिथुन अशोक जैस्वाल (४२, रा. पारिजात नगर सिडको एन-४) यांच्या तक्रारीनुसार, ते शनिवारी दुपारी १.३० वाजता त्यांच्या प्रभू सेवा आयुर्वेदा मेडिकल दुकानात बसलेले होते.

Crime News
Sambhajinagar News : मनपाकडून ८० टक्के कर वसुलीची अट शिथिल

त्यावेळी जय भवानी नगर भागातील सराईत गुन्हेगार वैभव शिंदे, विजय जगताप आणि कार्तीक बामणे हे तिघे दुकानात शिरले. दुकानात येताच वैभव शिंदे याने ग्राहकांसाठी ठेवलेली खुर्ची उचलून थेट जैस्वाल यांच्या डोक्यात भिरकावली, मात्र त्यांनी ती उजव्या हाताने अडवली. खुर्ची का मारता ? असा जाब विचारला असता, विजय जगताप याने आम्हाला दारू प्यायला पैसे दे, नाहीतर तुला इथेच खतम करतो अशी धमकी दिली.

त्यावर जैस्वाल यांनी पैसे देण्यास नकार देताच, वैभव शिंदे याने कमरेचा धारदार चाकू बाहेर काढला आणि तू पैसे दिले नाहीस, आता तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत जैस्वाल यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला खुपसला. जैस्वाल रक्तबंबाळ झाले. ते ओरडत असताना विजय आणि कार्तीकने त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.. त्यानंतर आरोपींनी दुकानाच्या गल्ल्यात किराणा आणण्यासाठी ठेवलेले १ हजार २०० रुपये जबरदस्तीने लुटले.

दहशतीने दुकानदार, फेरीवाले पळाले

पैसे लुटल्यानंतर आम्ही या एरियातील डॉन आहोत, लक्षात ठेव तुला सोडणार नाही असा दम भरत तिघेही दुकानातून बाहेर पडले. आरोपींची ही गुंडगिरी आणि हातातील रक्ताळलेला चाकू पाहून आजूबाजूचे दुकानदार आणि फेरीवाले भीतीने दुकाने बंद करून पळून गेले. अतिरक्तस्राव होत असताना जैस्वाल यांनी भाऊ अमित यांना फोन करून घटनेची माहिती दिली. भावाने तातडीने धाव घेत त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले, तिथे डॉक्टरांनी त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया केली.

आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार

याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह अन्य कलमाखाली गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विनोद भालेराव, अंमलदार सुधीर चव्हाण, अंकुश वाघ, अमोल आहेर आणि प्रल्हाद आघाव यांच्या पथकाने मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपी कार्तीक बामणे आणि विजय हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. विजय हा अवघ्या काही महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला आणि मारहाणीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news