Sambhajinagar News : मुख्य बसस्थानक बनले वाहनतळ

प्लॅटफॉर्मपर्यंत खासगी वाहनांची घुसखोरी; अपघाताचा धोका
Sambhajinagar News
Sambhajinagar News : मुख्य बसस्थानक बनले वाहनतळfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar Main bus station turns into a parking lot

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील मुख्य बसस्थानकात प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या खासगी वाहनांची थेट प्लॅटफॉर्मपर्यंत घुसखोरी वाढली आहे. दुचाकी व चारचाकी घेऊन थेट फलाटापर्यंत जात असल्याने बसस्थानक वाहनतळ बनले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. मात्र याकडे बसस्थानक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा कानाडोळा करीत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.

Sambhajinagar News
ST Bus Smart Card : एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुख्य बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी विविध मार्गावरील एसटीने प्रवास करतात. फलाटांवर बसची सतत ये-जा सुरू असते. अशा वेळी प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्यांची खासगी वाहने थेट प्लॅटफॉर्मपर्यंत जात आहेत. काही वाहनधारक बसच्या अगदी जवळ वाहन उभे करून प्रवाशांचे सामान उतरवितात.

त्यामुळे बसचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि हातात सामान घेऊन बसकडे जाणाऱ्या प्रवाशांना या वाहनांमुळे मार्ग काढणे कठीण होत आहे. यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

Sambhajinagar News
Mahavitaran News : कडा भवनची जागा वीज उपकेंद्रांसाठी उपलब्ध

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंत खासगी वाहनांना परवानगी द्यावी; मात्र फलाटावर वाहनांना प्रवेश देऊ नये. प्रवाशांना सोडण्यासाठी स्वतंत्र ड्रॉप ऑफ जागा निश्चित करावी. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात करून नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

प्रशासन, सुरक्षारक्षकांची डोळेझाक

या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सुर-क्षारक्षकांकडूनही प्रभावी कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. काही वेळा सुरक्षारक्षक वाहनधारकांना केवळ सूचना देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे बसस्थानकात खासगी वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी वाहनांना मुक्त प्रवेश देणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने या वाहनांचा वेळीच बंदोबस्त कारावा, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने वेळीच ठोस उपाय-योजना न केल्यास गर्दीच्या वेळी मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बसच्या ये-जा मार्गात वाहनांमुळे अडथळे

महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना धोका

मोठ्या अपघाताची शक्यता

गर्दीच्या वेळी फलाटावर वाहतूक कोंडी

सुरक्षारक्षकांकडून प्रभावी नियंत्रणाचा अभाव

स्वतंत्र वाहनतळ असतानाही फलाटावर वाहनांची गर्दी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news