

Sambhajinagar Kharif crop damage due to heavy rains
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, कापूस, उडीद, मूग, मका व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे.
शेतकरी कृती समितीने जिल्हाधिकारी, आमदार प्रशांत बंब व गंगापूर तहसीलदार यांना महेशभाई गुजर, राहुल ढोले व अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलेनिवेदनात शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई तत्काळ देणे, खरीप २०२५ हंगामासाठी १०० टक्के पीक विमा लागू करणे आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
पंचनाम्याचे काम रखडले असून याबाबत तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी समितीने केली आहे. शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २५ ऑगस्ट २०२५ रोजी किसान क्रांती चौक पिंपळगाव दिवशी तसेच नादगाव महामार्ग व इसारवाडी फाटा (पुणे मार्गावर) आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी कृती समितीने दिला आहे.