Sambhajinagar News | ‘या अल्लाहा... पाऊस दे!’ कन्नडमध्ये मुस्लिम बांधवांची आर्त प्रार्थना

मुस्लिम बांधवांची विशेष नमाज देशाच्या शांततेसाठीही प्रार्थना
Kannad Namaz For Rain
मुस्लिम बांधवांनी पावसासाठी विशेष नमाज-ए-इस्तिस्कारा अदा करून सामूहिक दुआ केली Pudhari
Published on
Updated on

Kannad Namaz For Rain

कन्नड : पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिके संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहरातील मुस्लिम बांधवांनी पावसासाठी विशेष नमाज-ए-इस्तिस्कारा अदा करून सामूहिक दुआ केली.

अक्कलकुवा मदरशाचे मौलाना शैखुलहदीस यांच्या मार्गदर्शनाखाली दोन रकअत नफील नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर पावसासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. उपस्थितांनी दोन्ही हात उंचावून मुबलक पाऊस पडावा, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळाच्या संकटातून दिलासा मिळावा, अशी आर्त विनवणी केली. यावेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

Kannad Namaz For Rain
Sambhajinagar News : गुंठेवारीतील दंडमाफीची सवलत महापालिकेच्या पथ्यावर

तालुक्यात पावसाअभावी उभी खरीप पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत पावसासाठी प्रार्थना केली. यासोबतच देशात शांतता, सौहार्द व बंधुभाव कायम राहावा, देशवासीयांवर कोणतेही संकट ओढवू नये, यासाठीही विशेष दुआ करण्यात आली.

सामूहिक नमाजमधून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. आता शेतकरी व नागरिकांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news