

Kannad Chalisgaon Ghat Accident
कन्नड : कन्नड चाळीसगाव औट्रम घाटात राष्ट्रीय महामार्ग घाट परिसरात बुधवारी (दि.७) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास (एम एच - 16 DS - 6050) या सेव्हन सीटर कारचा भीषण अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीस व कन्नड महामार्ग पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव, (जि.अहिल्यानगर) येथून उज्जैनकडे देव दर्शनासाठी जात असलेली सेव्हन सीटर कार कन्नड घाटाच्या सुरुवातीच्या चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाणे च्या हद्दीत कार अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त झाली.
या अपघातात तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७), रा. शेवगाव, शेखर रमेश दुरपते (वय ३१), रा. शेवगाव, घनशाम रामहरी पिसोटे (वय ३०), रा. शेवगाव यांचा मृत्यू झाला असून अक्षय शिवाजी गिरे (वय २५), रा. शेवगाव ज्ञानेश्वर कांता मोडे (वय २४), रा. शेवगाव तुषार रमेश घुगे (वय २६), योगेश तुकाराम सोनवणे (वय २८, सर्व रा. शेवगाव) हे गंभीररित्या जखमी झाले आहे.
जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यातील तिघांना मृत घोषित केले, तर चौघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातातील जखमी व मृतांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले असून घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा अधिक तपास चाळीसगाव ग्रामीण पोलिस यंत्रणेकडून सुरू आहे.