Sambhajinagar Accident : सासुरवाडीला निघालेले दाम्पत्य टेम्पोखाली चिरडून ठार; मुलगा गंभीर जखमी

कांचनवाडी उड्डाणपुलावर टेम्पोचालकाच्या यूटर्नने घेतले दोन बळी
Sambhajinagar Accident
Sambhajinagar Accident : सासुरवाडीला निघालेले दाम्पत्य टेम्पोखाली चिरडून ठार; मुलगा गंभीर जखमीFile Photo
Published on
Updated on

Couple crushed to death under tempo; son seriously injured

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सासऱ्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना भेटण्यासाठी पत्नी, मुलासह दुचाकीने बदनापूरकडे निघालेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. टेम्पो चालकाने अचानक यूटर्न घेतल्याने दुचाकी टेम्पोला धडकून दोघे पती-पत्नी चाकाखाली चिरडून ठार झाले. तर १३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी आहे. हा भीषण अपघात गुरुवारी (दि.१३) सकाळी ११ वाजेच्या सुमारास कांचनवाडी उड्नुणपुलावर घडला.

Sambhajinagar Accident
Municipal contract employees : शासकीय सुट्यांचा मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही लाभ

गजानन सांडूसिंग गुमलाडू (४०, वरझडी, ता. गंगापूर) पत्नी राधा गजानन गुमलाडू (३५) अशी मृतांची नावे असून गंभीर जखमी मुलगा विशाल (१३) याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. अपघातानंतर नागरिकांनी टेम्पोचालक अनिल संजय राठोड (३०) याला ताब्यात घेत सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले.

नातेवाइकांच्या माहितीनुसार, गजानन हे एका खडी क्रशरच्या क्रेनवर चालक म्हणून कामाला होते. गुरुवारी त्यांची सुटी होती. त्यांच्या सासऱ्यांची अनेक दिवसांपासून तब्येत खराब असल्याने सकाळी दहाच्या सुमारास ते पत्नी व मुलगा विशाल याला घेऊन दुचाकीने बदनापूर येथील राजावाडी येथे निघाले. १६ वर्षीय मोठ्या मुलाला त्यांनी घरीच ठेवले होते. तर त्यांचे मेव्हणे दुसऱ्या एका दुचाकीने मागेपुढे होते.

Sambhajinagar Accident
Encroachment Removal Action : मुकुंदवाडीसारखीच पैठणगेटवरही मनपाकडून पाडापाडीची तयारी

ते पोस्ट ऑफिसला नोकरीला असल्याने ते शहरात वळले तर गजानन हे हायवेने जालन्याच्या दिशेने निघाले. कांचनवाडी पुलावर आयशर टेम्पो (एमएच-४८- बीएम- २४५५) चालकाने मुख्य रस्त्यावर अचानक यूटर्न घेण्यासाठी वळवल्याने गजानन यांची दुचाकी टेम्पोवर आदळली.

चाकाखाली सापडून दोघे चिरडले गेले, डोक्याला, छातीला जबर मार लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गुमलाडू दाम्पत्याने जागेवर प्राण सोडले. तर त्यांचा मुलगा विशालच्या छाती व तोंडाला मार लागला आहे.

त्याचे शरीर अनेक ठिकाणी फॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे. दरम्यान, गजानन यांच्या पश्चात भाऊ, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.

फेरा चुकविण्याच्या नादात अचानक वळला

कांचनवाडीच्या उड्डाणपुलावरून न जाता टेम्पो चालकाला खालच्या बाजूने वाळूज एमआयडीसीकडे जायचे होते. मात्र उड्डू- ाणपुलावर चढल्याने मोठा फेरा पडणार होता. तो वाचवण्यासाठी त्याने थेट उजव्या बाजूच्या पहिल्या लेनमधून यूटर्न घेतला. आयशर टेम्पो थेट रस्त्यावर आडवा झाल्याने पाठीमागून आलेल्या गजानन यांची दुचाकी त्यावर आदळली. टेम्पोखाली सापडून दाम्पत्य जागीच ठार झाले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news