Marathwada heavy rain | संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी

Maharashtra rain updates | रामनगरमध्ये १०९.५० मिमी पावसाची नोंद
Marathwada heavy rain | संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यात मंगळवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच आणि जालना जिल्ह्यातील चार अशा एकूण नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टी म्हणजे ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी २० मि. मी. तर जालना जिल्ह्यात सरासरी २१ मी. मी. पावसाची नोंद झाली.

Marathwada heavy rain | संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी
Marathwada water crisis : मराठवाड्यात टँकरची संख्या तीनशेच्या पार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कचनेर मंडळात ८० मिमी, पैठण तालुक्यातील आडूळ मंडळात ९८.७५ मिमी, बालानगर मंडळात ७८.७५ मिमी, सिल्लोड तालुक्यातील भराडी मंडळात ८४.२५ मिमी आणि बोरगाव मंडळात ६९ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच जालना तालुक्यातील जालना सिटी मंडळात ८७ मिमी, रामनगर मंडळात १०९.५० मिमी, पाचणवडगाव मंडळात अतिवृष्टी झाली.

Marathwada heavy rain | संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी
Marathwada Water Crisis : मराठवाड्यात टँकरची संख्या चारशेच्या घरात, टंचाईचे संकट कायम

अंबड तालुक्यातील धनगरपिंप्री मंडळात ९१ मिमी पाऊस झाला. महसूल विभागाच्या निकषानुसार २४ तासांत ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास त्या मंडळात अतिवृष्टी झाल्याचे मानले जाते. प्राथमिक आकडेवारीनुसार विभागातील नऊ मंडळांनी हा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसांपर्यंत पावसाच्या नोंदींमध्ये उशिराने प्राप्त झालेल्या माहितीनुसार बदल होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Marathwada heavy rain | संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी
Sambhajinagar Rain : दिवसा ऊन, असाह्य उकाडा, अन् रात्री अवकाळी पावसाचा दिलासा

मराठवाड्यातील पर्जन्यमान

  • छत्रपती संभाजीनगर - १९.९ मिमी

  • जालना - २१ मिमी

  • बीड - ३.९ मिमी

  • लातूर - ०.१ मिमी

  • धाराशीव - ०.७ मिमी

  • नांदेड - २.४ मिमी.

  • परभणी - १.९ मिमी

  • हिंगोली - २.६ मिमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news