Sambhajinagar Rain : दिवसा ऊन, असाह्य उकाडा, अन् रात्री अवकाळी पावसाचा दिलासा

विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.
sambhajinagar rain
Sambhajinagar News : दिवसा ऊन, असाह्य उकाडा, अन् रात्री अवकाळी पावसाचा दिलासाPudhari Photo
Published on
Updated on

Sunshine and unbearable heat by day, and the relief of unseasonal rain by night

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिवसभर पडणारा प्रखर उन्हाचा तडाखा आणि वाढलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना शुक्रवारी (दि. २२) रात्री अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला. रात्री साडेआठच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.

sambhajinagar rain
Sambhajinagar heatwave : १० वर्षांतील तापमानाचा उच्चांक; संभाजीनगरकर होरपळले, पारा ४३.६अंशांवर

शहरातील विविध भागांत सुमारे २५ ते ३० मिनिटे पाऊस पडला. काही ठिकाणी जोरदार, तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाचा चटका वाढला होता, त्यातच हवेतील आर्द्रतेमुळे उकाड्यात मोठी वाढ झाली होती.

sambhajinagar rain
Sambhajinagar temperature : हंगामातील रेकार्ड ब्रेक तापमान, पारा ४१.०८ अंशांवर

मात्र, सायंकाळनंतर अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. शहरातील ज्युबिली पार्क, घाटी, मिल कॉर्नर, समर्थनगर, क्रांतीचौक, उस्मानपुरा, जालना रोड, सिडको, हडको आणि चिखलठाणा परिसरात पावसाचा जोर चांगला होता. तर शिवाजीनगर, पुंडलिकनगर आणि सातारा-देवळाई भागात मध्यम पाऊस झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news