Chhatrapati Sambhajinagar Land Dispute : हे राम ! सातबारावर देवाचे नाव; तरी प्लॉटची बिनधास्त खरेदी-विक्री

देणाऱ्यासोबतच घेणारेही दोषीच, २१ दिवसांनंतरही गुन्हा दाखल होईना
Chhatrapati Sambhajinagar Land Dispute
हाच तो देवाचा नावाचा सातबारा.pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर: जाधववाडी मोंढ्यापासून काही अंतरावर असलेल्या त्या वादग्रस्त ४१ एकर जागेच्या सातबारावर श्री राम मंदिर संस्थान बालाजी मठ असे स्पष्ट अक्षरामध्ये नाव आहे. असे असतानाही त्या जागेत प्लॉट काढणे आणि ते विक्री करण्याची हिम्मत विकासक श्रीरामानंद बिल्डर्स अॅण्ड लॅण्ड डेव्हपर्सच्या वतीने मुकुंद गंगाधरराव कुलकर्णी यांनी विक्री केली. अन् विशेष म्हणजे सातबारामध्ये देवाचे नाव नमूद असतानाही ती जागा त्या ८० ते ९० जणांनी खरेदी केलीच कशी, असादेखील सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे विक्री करणाऱ्यासोबतच खरेदी करणारेही तेवढेच दोषी असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. विशेष म्हणजे २१ दिवसांनंतरही महापालिकेने या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही.

जमीन शासनाकडे जमा होणार का ?

शहराच्या नवीन मोंढा परिसरात अगदी मोक्याच्या ठिकाणी प्रभू श्री राम मंदिराची गट क्रमांक १२४ आणि गट क्रमांक १२५ मध्ये अनुक्रमे २१ आणि २० एकर जागा आहे. ही जागा सरकारी खिदमतमास वर्ग २ मध्ये मोडते. शासन आदेशानुसार जर अशा जमिनीवर परवानगी न घेताच खरेदी-विक्रीची कोणतही प्रक्रिया केली. तर ती जमीन सरकारकडे जमा केली जाते. त्यामुळे प्रभू श्री रामांची ही जमीन शासन जमा करून घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Land Dispute
Chhatrapati Sambhajinagar Cancer Hospital : कोबाल्ट बॅकीथेरपी युनिटमुळे कर्करुग्णांच्या उपचारांना मिळणार बळ

ट्रस्टींच्या साक्षीनेच विकास कामे

प्रभू श्री राम यांच्या २१ एकर जागेवर वॉल कंपाऊंड तयार करणे, अंतर्गत रस्ते तयार करणे, पथदिवे उभारणे यासह इतर विकास कामे मंदिर ट्रस्टींच्याच साक्षीने झाल्याचा आरोप श्रीरामानंद बिल्डर्स अॅण्ड लॅण्ड डेव्हपर्सच्या वतीने मुकुंद गंगाधरराव कुलकर्णी यांनी केला आहे. एवढेच नव्हे त्यासंदर्भातील छायाचित्रे देखील आपल्याकडे असल्याचा दावा देखील केला आहे.

मनपाच्या कारवाईचा पुरावा

या प्रकाराच्या वर्ग २ शासकीय जमिनी सरकार जमा करताना प्रशासनाला पुरावे लागतात. अन् या गट नंबर १२४, १२५ मधील ४१ एकरच्या जागेबाबत खुद्द मनपाची बेकायदा प्लॉटिंगविरोधातील अतिक्रमण हटाव कारवाईच पुरावा आहे. त्यामुळे आता प्रशासनाला सहज जमीन शासन जमा करता येईल, अशी देखील चर्चा होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Land Dispute
Sambhajinagar Crime : नशेसाठी दुचाकी चोरणारे दोघे, विल्हेवाट लावणारा गॅरेजचालक गजाआड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news