Chhatrapati Sambhajinagar Crime : हॉटेल व्यवसायातील भागीदारावर हल्ला करून नाक केले फॅक्चर

हॉटेल व्यवसायातील भागीदारावर हल्ला करून नाक केले फॅक्चर
Chhatrapati Sambhajinagar Crime
हॉटेलसमोर जाधव याला मारहाण करताना आरोपीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : उच्चभ्रू सिडको कॅनॉट प्लेस परिसरातील 'हॉटेल लकाशा'च्या भागीदारीतून उद्भवलेल्या १८ लाख रुपयांच्या वादातून एका भागीदाराने साथीदारांसह मिळून दुसऱ्या भागीदारावर धारदार वस्तूने हल्ला करून राडा घातला. आरोपींनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याच्या नाकावर धारदार वस्तूने प्रहार करून नाक फॅक्चर केले. ही घटना बुधवारी (दि.२८) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एन-५ सिडकोतील राज क्लॉथ सेंटरजवळ घडली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत सुरेंद्रसिंग राठोड (३२, रा. एन-१२ हडको), शिवराज रमेश इधाटे (१९, रा. सुदर्शननगर, एन ११), प्रथमेश लक्ष्मण अधाने (२४, रा. एन ११ हडको) आणि दीपक भाऊसाहेब मोटे (२४, रा. गजानन नगर, एन ११) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून हल्ल्यात वापरलेले हातातील कडे जप्त केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Sambhajinagar ST Bus Robbery : एसटी प्रवासात वृद्धाला गुंगीचे बिस्किट चारून ३ तोळ्यांच्या अंगठ्या लंपास

फिर्यादी दिनेश संजयसिंग जाधव (२३, रा. तापडिया नगर, गारखेडा परिसर) याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याने आणि आरोपी प्रशांत राठोड दोघांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी भागीदारीमध्ये एन-५ सिडको येथील कॅनॉट प्लेसमधील राज क्लॉथ सेंटरच्या शेजारी 'हॉटेल लाकासा' सुरू केले होते.

दोघांनी हॉटेलमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती आणि व्यवसाय सुरळीत सुरू होता. मात्र, काही दिवसांपासून प्रशांत राठोड याने मला या हॉटेलमध्ये भागीदारी नको आहे, माझे १८ लाख रुपये मला परत दे, असा तगादा दिनेशकडे लावला होता. या पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. बुधवारी (दि.२८) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास दिनेश जाधव हा हॉटेल लाकासा येथे विसरलेला मोबाईल चार्जर आणण्यासाठी गेला होता.

तो चार्जर घेऊन हॉटेलबाहेर पडला आणि पार्किंगमधील मोटारसायकलजवळ पोहोचला. त्यावेळी आरोपी प्रशांत राठोड आणि त्याच्या साथीदारांनी दिनेशचा मित्र सचिन बसैये याला पकडून रोखून धरले. त्यानंतर प्रशांतने दिनेशला, माझे भागीदारीचे १८ लाख रुपये आताच्या आता परत दे, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Sambhajinagar Building Slab Collapse : महापालिकेच्या परवानगीविनाच चिकलठाण्यातील इमारतीचे बांधकाम

दिनेश काही समजण्याच्या आतच प्रशांत राठोड याने धारदार वस्तूने दिनेशच्या नाकावर प्रहार केला. त्यामुळे त्याच्या नाकाचे हाड फॅक्चर झाल्याने तो खाली कोसळला. त्याच वेळी प्रशांतचे साथीदार प्रथमेश, सागर आणि शिवराज इधाटे यांनी दिनेशला घेरून जमिनीवर पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पैसे दिले नाहीस तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन हे टोळके घटनास्थळावरून पसार झाले. गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार भाऊसाहेब जगताप करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.