Sambhajinagar Food Safety Raid : बजरंग तेल कंपनीतून २३.३५ लाखांचे संशयास्पद खाद्यतेल जप्त

जुना मोंढा भागात एफडीएची कारवाई, १२,३८२ किलोचा साठा पकडला
Sambhajinagar Food Safety Raid
जुना मोंढ्यातील बजरंग तेल कंपनीतून जप्त खाद्यतेल साठ्यासह एफडीएचे सह आयुक्त श्रीकांत करकळे व पथक.pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : जुना मोंढा जाफर गेट येथील बजरंग ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकून तब्बल २३.३५ लाख किमतीचे संशयास्पद, अपमिश्रित आणि चुकीचे बँडिंग असलेले खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. या तेल कंपनीचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. सणासुदीच्या अनुषंगाने एफडीए पथकाकडून सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेंतर्गत पथकाने अचानक धाड टाक केलेल्या तपासणीदरम्यान अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या असून, अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्यामुळे या कंपनीला 'नॉन-कॉम्प्लायन्स' (अपात्र) घोषित करण्यात आले आहे.

Sambhajinagar Food Safety Raid
Chhatrapati Sambhajinagar Voter List : भाजपच्या एक गठ्ठा फॉर्म ७विरोधात एमआयएम मैदानात

तपासणीमध्ये कंपनीच्या छतावर कचऱ्याचे ढीग साचलेले, स्वच्छतागृह आणि वॉशरुम अत्यंत अस्वच्छ आढळले. खाद्यपदार्थ आणि पॅकेजिंग साहित्य एकाच ठिकाणी अयोग्य पद्धतीने साठवले होते. जमिनीवर पॅलेट (कंटेनर कप्पे) न वापरताच थेट माल ठेवण्यात आला होता. सर्वत्र तेल गळतीमुळे फरशी अत्यंत तेलकट आणि घसरडी झाली होती. खिडक्यांना जाळ्या नव्हत्या तसेच उंदरांना पकडण्यासाठी ट्रॅप्स (पिंजरे) बसवले नव्हते. कामगारांची वैद्यकीय तपासणी केली नव्हती. तसेच त्यांनी डोक्यावर कॅप, अॅप्रन किंवा हातमोजे घातले नव्हते.

उत्पादनांची चाचणीसाठी कंपनीत कोणतीही मान्यताप्राप्त प्रयोगशाळा किंवा अन्न तंत्रज्ञ नेमलेला नव्हता. खरेदी केलेल्या तेलाचा कोणताही अधिकृत रेकॉर्ड किंवा कागदपत्रे तपासणीत सादर करता आला नाही. त्यामुळे २३ लाख ३५ हजार६५४ रुपये किमतीचे संशयास्पद खाद्यतेल जप्त केले आहे. सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका झाडे यांनी सहकाऱ्यांसह पार पाडली.

Sambhajinagar Food Safety Raid
Sudin Dhavalikar | मगो पक्ष भाजपसोबत युतीतच राहणार; मंत्री सुदिन ढवळीकर यांची स्पष्टोक्ती
Administrator

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news