Sudin Dhavalikar | मगो पक्ष भाजपसोबत युतीतच राहणार; मंत्री सुदिन ढवळीकर यांची स्पष्टोक्ती

मंत्री सुदिन ढवळीकर : भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत जागा वाटपाची चर्चा करणार
Goa Sudin Dhavalikar
Goa Sudin Dhavalikar
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मगो पक्ष भारतीय जनता पक्षासोबत युतीत राहणार आहे. जागा वाटपाबाबत भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत चर्चा होणार आहे. मगो पक्षाने केलेल्या सर्व्हेत पेडणे, फोंडा व डिचोलीत मगो पक्ष भाजपपेक्षा पुढे आहे, अशी प्रतिक्रिया वीज मंत्री तथा मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी दिली.
मगो पक्ष जास्त जागांची मागणी करत असून, तेवढ्या न दिल्यास भाजप सोबतची युती तोडणार, अशी चर्चा राज्यात रंगली आहे.

Goa Sudin Dhavalikar
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

या पार्श्वभूमीवर मंगळवारी पणजीत ढवळीकर यांना पत्रकारांनी भाजप-मगो युतीबाबत विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ढवळीकर म्हणाले की, भाजप व मगो समविचारी पक्ष असल्याने आमची युती झालेली आहे. डिचोली, पेडणे, फोंडा, मडकई, प्रियोळ, सावर्डे, मांड्रें हे मतदारसंघ मगो पक्षाने काही वर्षांत जिंकले आहेत. २०२२ मध्ये जरी मडकई व मांड्रेत मगो विजयी झालेला असला तरी डिचोली, पेडणे, फोंडा, शिरोडा व प्रियोळ येथे मगो दुसऱ्या क्रमांकावर होता.

या मतदारसंघात मगोची मते आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीचा विचार करून मगो एक राजकीय पक्ष म्हणून तिथे काम करत आहे. त्यात वावगे काही नाही, असे उत्तर भाजपच्या मतदारसंघात मगोने सुरू केलेल्या कामाबद्दल विचारले असता ढवळीकर यांनी दिले. फोंड्यात मगो वरचढ आहे.

हे फोंडेकर सांगू शकतील. त्यामुळे तिथे कार्यालय उघडले आहे. असे सांगून किती जागा मागणार किंवा लढणार हे अद्याप ठरलेले नाही. त्याबाबतचा निर्णय मगोची निवडणूक समिती ठरवेल. डिचोलीतही मगोला चांगले वातावरण आहे. तिथे भाजपात गटबाजी आहे. भाजप-मगोची युती ही भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी केलेली आहे. त्यामुळे युतीबाबत भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत चर्चा केली जाईल. स्थानिक भाजप नेत्यांशी आपले संबंध चांगले आहेत, असे ढवळीकर यांनी सांगितले.

Goa Sudin Dhavalikar
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

आपण पक्षनिष्ठ, ते फुटिर

मांड्रेंच माजी आमदार दयानंद सोपटे व शिरोडाचे आमदार व सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी मगोवर केलेल्या टीकेवर बोलताना मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, ते दोन्ही पक्षबदलू आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या टीकेकडे लक्ष देत नाही. सध्याच्या विधानसभा सर्वात जास्त काळ एकाच पक्षात राहून सर्वात वेळेला जिंकणारा आपण आमदार आहे. आपण पक्षनिष्ठ आहे. त्यामुळे फुटिरांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विजेची समस्या कमी होतेय...
राज्यातील विजेची समस्या हळूहळू कमी होत आहे. विजेची बिले सुरळीत येत आहेत. राज्याला कमी वीज पुरवठा होत असल्याने उद्योगांना विजेची टंचाई जाणवत होती. मात्र, त्यावर तोडगा काढला गेला आहे, असे वीज खात्याच्या प्रश्नावर बोलताना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news