Sambhajinagar Encroachment Campaign : बजाजनगरात अतिक्रमित मालमत्तांवर बुलडोझर

एमआयडीसीची कारवाई : पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविणे सुरू
Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar Encroachment Campaign : बजाजनगरात अतिक्रमित मालमत्तांवर बुलडोझर File Photo
Published on
Updated on

Sambhajinagar Encroachment Campaign Bulldozers on encroached properties in Bajajnagar

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा बजाजनगर येथील मोकळ्या भूखंडावर धार्मिक स्थळ वगळून झालेल्या इतर अतिक्रमणावर एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने सोमवारी (दि.४) पोलिस बंदोबस्तात कारवाई करत शेकडो अतिक्रमण बुलडोझरच्या सहाय्याने भुईसपाट केले. या कारवाईमुळे अतिक्रमणधारक दिवसभर साहित्य काढण्यात व्यस्त होते.

Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar Crime News : थार जीपने एटीएम ओढून फोडण्याचा प्रयत्न

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर ही मुख्य बाजारपेठ आहे. या भागात शाळा, महाविद्यालये, दवाखाने व बाजारपेठ असल्याने रस्त्यावर सतत नागरिकांची वर्दळ असते. मात्र रस्त्यालगत अतिरिक्त बांधकाम तसेच हातगाडी, व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना लहान मुले व नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. यातून रोजच अपघाताच्या घटना घडत असून यात अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे अतिक्रमण काढण्यात यावे अशा तक्रारी अनेकांनी संबंधित विभागाकडे केल्या होत्या.

तक्रारीची दखल घेत एमआयडीसी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, कार्यकारी अभियंता आर.डी. गिरी, उपअभियंता गणेश मुळीकर, सहायक पोलिस आयुक्त संजय सानप, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, एरिया मॅनेजर अशोक रसाळ, सहायक अभियंता योगेश तिडके, अजय चन्ने, प्रमुख भूमापक एस. एल. श्रीखंडे, ए.डी. सिरसे, रमेश डोईफोडे, तांत्रिक सहायक प्रशांत सरोदे हे मोठ्या फौजफाट्यासह बजाजनगरातील आंबेडकर चौकाजवळ दाखल झाले.

Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar News: 'तुझा शेवटचा दिवस आहे', वर्षभरापूर्वीच्या वादातून तरुणाच्या गालातच चाकू खुपसला

यावेळी त्यांनी १० जेसीबी, एक पोकलॅन, क्रेन तसेच १६ ट्रॅक्टरच्या मदतीने आंबेडकर चौकापासून रस्त्याच्या दुतर्फा असलेले संरक्षक भिंत आदींचे अतिक्रमण हटवत पुढे आम्रपाली बुद्ध विहाराजवळ आले. याठिकाणी अनेकांनी पत्राचे शेड टाकून दुकाने थाटली होती. पथकाने सदरील अतिक्रमण भुईसपाट केले.

त्यानंतर हरहर महादेव मंदिरालगत असलेले स्टेज तसेच पत्राच्या रूमवर जेसीबी चालविला. पथकाने पुढे लगतच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातील खोल्याचे अतिक्रमण काढण्यासाठी गेले. जेसीबी चालक खोल्यासमोरील गट्टू काढत असताना नागरिकांनी त्यास विरोध केला. यामुळे काही वेळासाठी अतिक्रमण हटविण्याचे काम बंद पडले होते. मात्र पथकाने नागरिकांना समजावून सांगत सदरील अतिक्रमण काढून टाकले. या दुपारनंतर पथकाच्या तीन तुकड्या करून श्री स्वामी समर्थ मंदिर, लक्ष्मीमाता मंदिर तसेच मोहटादेवी मंदिरालगत असलेले व्यावसायिक गाळे भुईसपाट करण्यात आले.

पंढरपूर येथे अहिल्यानगर महामार्गावरील भाजी मंडईचे अतिक्रमण अनेकांनी स्वतःहून काढून घेतले होते. मात्र याठिकाणी राहिलेल्या अतिक्रमणावर पथकाने जेसीबी फिरविला. दरम्यान दुसऱ्या पथकाने बजाजनगरातील एमआयडीसीच्या मोकळ्या ओएस १९/१ या भूखंडवर अतिक्रमित इंग्रजी शाळेचे पक्के बांधकाम पाडणे सुरू होते. मात्र या शालेय व इरत साहित्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पथकाने त्यांना सामान काढून घेण्यासाठी मुदत दिली. एका खासगी संस्थेने खदानीत मुरूम व माती टाकून खदानीचा काही भाग सपाट करून याठिकाणी वर्गखोल्या बांधल्या आहेत. या वर्गखोल्या पाडापाडीचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

मोहीम सुरुच राहणार

बजाजनगर येथील अतिक्रमण काढण्यासाठी ही मोहीम यापुढे सुरूच रा-हणार आहे. बजाजनगरातील संपूर्ण अतिक्रमण काढल्यानंतर लगेच वाळूज औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमण हटवले जाणार असल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

प्रताप चौकातील कारवाईकडे लक्ष

महाराणा प्रताप चौकातील स्व. मीनाताई ठाकरे मार्केट भागातील अनेक मालमत्ता अतिक्रमण बाधित आहेत. अंतर्गत रस्ते देखील भिंती बांधून बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या भागातील एमआयडीसीचा हरित पट्टा आणि सर्विस रोडच गायब आहे. त्यामुळे महाराणा प्रताप चौकातील अतिक्रमणावर एमआयडीसी काय कारवाई करते याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news