

Sambhajinagar Crime A young man who came to sell mandul was arrested.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मांडूळ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पडकले. ही कारवाई गुरुवारी (दि.४) पहाडसिंगपुरा भागात करण्यात आली. विजय रमेश काळे (३२, रा. पार्वतीनगर, पहाडसिंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४० लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप शिंदे, जमादार, योगेश नवसारे, मनोज विखनकर, राहुल बंगाळे, मंगेश शिंदे यांचे पथक गस्तीवर असताना त्यांना एक जण सर्पवर्गीय मांडूळ तस्करी, विक्रीसाठी घेऊन बौद्धलेणी, बेगमपुऱ्याकडे जात असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार, पथकाने प्लास्टिकच्या बास्केटमध्ये पायी जाणाऱ्या काळेला पकडले. त्याच्या बास्केटमध्ये अडीच फूट लांबीचे मांडूळ आढळून आले. वनरक्षकांना पाचारण करण्यात येऊन जप्ती पंचनामा करण्यात आला. त्यानंतर वनरक्षक दामू पवार यांच्याकडे मांडूळ सुपूर्द करण्यात आले.