Sambhajinagar cooperative society scam : राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालिकेचा जामीन अर्ज फेटाळला

आर्थिक गुन्हे केवळ व्यक्तीविरुद्ध नसून समाजावर घाला घालणारे : उच्च न्यायालय
Sambhajinagar cooperative society scam
औरंगाबाद खंडपीठpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील करोडो रुपयांच्या कथित अपहाराप्रकरणी अटकेत असलेल्या संचालिका प्रेमलता बद्रीनारायण बाहेती यांचा नियमित जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला. न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांनी या प्रकरणातील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय दिला.

सुनावणीदरम्यान सरकारी वकील प्रीती डिग्गीकर यांनी जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, लातूर येथील उदगीर शहर आणि छत्रपती संभाजीनगरमधील जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे १३ कोटी आणि ६.५ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे नमूद आहे.

Sambhajinagar cooperative society scam
Chatrapati Sambhajinagar News : चक्क खासगी व्यक्तींने घेतला दुय्यम निबंधकांच्या खुर्चीचा ताबा

अर्जदार महिला असूनही, कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता त्यांना ४ कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित करण्यात आले होते. ऑडिट रिपोर्टनुसार, त्यांच्यावर एकूण ११.५२ कोटी रुपयांची थकबाकी असून, त्यांच्याविरुद्ध विविध जिल्ह्यांत तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत.

Sambhajinagar cooperative society scam
MERC Electricity Tariff: वीजदरवाढीवर तिसरी ई-जनसुनावणी; एमईआरसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

न्यायालयाने नमूद केले की, ठेवीदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. अर्जदाराने समानतेच्या तत्त्वावर जामीन मागितला होता, परंतु इतर सह आरोपींची भूमिका वेगळी असल्याने न्यायालयाने तो फेटाळला. आर्थिक गुन्हे हे केवळ व्यक्तीविरुद्ध नसून समाजाच्या आर्थिक कल्याणावर घाला घालणारे असतात, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने अर्जदाराला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news