Sambhajinagar News : वाकडी गावात दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ग्रामपंचायत झोपेत : नागरिकांतून तीव्र संताप, लक्ष देण्याची गरज
Sambhajinagar News
Sambhajinagar News : वाकडी गावात दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात File Photo
Published on
Updated on

Sambhajinagar Contaminated water supply in Wakadi village

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील वाकडी गावात दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असून या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. या दुषित होणारा पाण्याने गॅस्ट्रोएन्टेरायटिस हा पावसाळ्ळ्यात सर्वात जास्त आढळून येतो.

Sambhajinagar News
Sambhajinagar Crime News : शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष, ज्येष्ठ नागरिकाची ९ लाख ४६ हजारांची फसवणूक

परिणामी, येथील नागरिकांचे आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना पायी चालणे अवघड होऊन बसले आहे. तरीदेखील ग्रामपंचायत झोपेचे सोंग घेत असल्याचे आरोप होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा करणाऱ्या (जलकुंभ) टाकीजवळ व्हॉल्व्ह लिक झाल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या ठिकाणी पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरवर्षी गल्लीत रस्त्यासाठी अनेक ठराव घेण्यात येतात. परंतु प्रत्यक्षात एक गल्लीत रस्त्याचे काम होत नाही.

Sambhajinagar News
T-55 tank : भारतीय लष्कराचा टी-५५ रणगाडा शहरात दाखल

येथील ग्रामपंचायत विकासात शून्य असून दरवर्षीचा निधी कुठे खर्च होतो असा देखील प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. गावात अनेक भागात गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर पसरत असून रस्त्यावरही जागोजागी खड्डे निर्माण झाले आहे. परीणामी या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून अस्वच्छतेने कळस गाठल्याने गावात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाचे पाणी जंलकुभाच्या परिसरात साचत आहे. हेच पाणी व्हॉल्व्हद्वारे पाईपलाइनमध्ये जाऊन गावाला पुरवठा करण्यात असल्याचे दिसून येत आहे.

झोपेचे सोंग...

गावातील काही गल्लीत तर नीट पायीदेखील चालता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून ग्रामपंचायत प्रशासक नुसते झोपेचे सोंग घेत आहे.

येत्या दोन-तीन दिवसांत व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात येईल. यानंतरच गावाला पाणी पुरवठा करण्यात येईल. पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत आहे.
संदीप सपकाळ, ग्रामसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news