Chhatrapati Sambhajinagar census : जनगणनेला दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करणार

मनपा आयुक्तांचा इशारा : निलंबनासह होणार पगार कपातीची कारवाई
India Census 2026
India Census 2026file photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जनगणना प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून ड्युटीवर गैरहजर राहणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा सोमवारी (दि.११) मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला. या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.

जनगणना ही राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून त्यात कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. आदेश मिळूनही कामावर न हजर राहणाऱ्या शिक्षकांची माहिती संकलित करण्याचे निर्देश सोमवारी महापालिका आयुक्त अमोल यंडगे यांनी आढवा बैठकीत दिले.

India Census 2026
Solapur News: रस्त्यांवर बेकायदा व्यापार करणाऱ्यांवर कारवाई

यासह महापालिका शाळांतील अनुपस्थित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. तसेच मनपा आस्थापनेवरील जे कर्मचारी अद्याप स्वगणना प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत, त्यांच्या विरोधातही कठोर पावले उचलली जाणार आहेत.

संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा बैठकीत देण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगारावर गंडांतर

मनपा आस्थापनेवरील जे कर्मचारी अद्याप स्वगणना प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत, त्यांची माहिती संकलित करा, त्यांच्या पगारातून कपात करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रशासनाकडून यावर स्वतंत्र लक्ष ठेवले जाणार आहे.

India Census 2026
Pune Overhead Cable Crackdown: पुण्यात ओव्हरहेड केबलवर कडक कारवाई; छोट्या इंटरनेट ऑपरेटरवरही गुन्हे

तर कठोर कारवाई

ज्या शिक्षकांना जनगणनेचे आदेश प्राप्त झाले आहेत त्यांनी विलंब न करता कर्तव्यावर रुजू व्हावे व संबंधित अहवाल वेळेत सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई अटळ असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news