Sambhajinagar Brib Case : लाच घेणारा ग्रामसेवक जाळ्यात

भायगाव येथील उपसरपंचालाच मागितले दहा हजार
Chhatrapati Sambhajinagar Bribe case
Sambhajinagar Brib Case : लाच घेणारा ग्रामसेवक जाळ्यातPudhari File Photo
Published on
Updated on

Sambhajinagar Brib Case gram sevak arrest

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीच्या कामाचे उर्वरित देयक काढून देण्यासाठी उपसरपंचाकडून दहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १८ जून रोजी रंगेहाथ पकडले.

Chhatrapati Sambhajinagar Bribe case
Shri Vitthal Ashram Dindi : श्री विठ्ठल आश्रमाच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

विजयकुमार पंडितराव क्षीरसागर, (५३,, पद-ग्रामसेवक रा. ३९ म्हाडा कॉलनी, शाहनुरवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

घटनेतील तक्रारदार हे वैजापूर तालुक्यातील भायगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच असून, गावातीलच जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीचे काम झाले होते. त्या कामाचे एकूण बिल सहा लाख ९६ हजार रुपये होते. दरम्यान ते काम पूर्ण झाल्याची नाहरकत (एनओसी) तक्रारदार यांनी ग्रामपंचायत कार्यालय भायगाव येथे दाखल केले.

Chhatrapati Sambhajinagar Bribe case
Shri Sant Eknath Maharaj Paduka Palkhi : श्रीसंत एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळ्याचे प्रस्थान

त्यापैकी राहिलेले उर्वरित रकमेचे ९४ हजार रुपयांचे बिल काढून चेक देण्यासाठी ग्रामसेवक विजय क्षीरसागर याने तक्रारदार यांचे नावे चेकवर सही करून देण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंबंधी तक्रार केली.

त्यांनी केलेल्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी तालुक्यातील जरूळ फाट्यावर सापळा रचला. दरम्यान १५ हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेवक विजय क्षीरसागर याला तडजोडीअंती १० हजार रुपये लाचेची रक्कम घेताना पथकाने रंगेहाथ पकडले.

कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलिस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे, संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, सी.एन. बागुल यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news