Sambhajinagar Bribe | बिडकीन येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी मागितली ६ हजारांची लाच; वैद्यकीय अधीक्षकाला रंगेहाथ अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: सफाई कर्मचाऱ्यालाही अटक
Bidkin Medical Superintendent Arrest
डॉ. विजय बजरंग दळवी, नारायण हरिश्चंद्र ब्राह्मणेPudhari
Published on
Updated on

Bidkin Medical Superintendent Arrest

बिडकीन : शासकीय योजनेंतर्गत मोफत होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाच मागितल्याप्रकरणी बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बजरंग दळवी (वय ५८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत त्यांच्यासोबत सफाई कर्मचारी नारायण हरिश्चंद्र ब्राह्मणे (वय ३७) यालाही अटक करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे एका ३७ वर्षीय तक्रारदाराने तक्रार केली होती. तक्रारदाराच्या बहिणीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठी डॉ. दळवी यांनी सुरुवातीला ६ हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद होते. मात्र, ही शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत होत असल्याने तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत ६ एप्रिल रोजी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.

Bidkin Medical Superintendent Arrest
Sambhajinagar News : जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे

तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष करण्यात आली असता, डॉ. दळवी यांनी १,२०० रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी ही रक्कम स्वतःकडे न घेता सफाई कर्मचारी नारायण ब्राह्मणे याच्याकडे देण्यास सांगितले.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने १,२०० रुपये दिल्यानंतर नारायण ब्राह्मणे याने ती रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर डॉ. दळवी यांनाही ताब्यात घेण्यात आले.

Bidkin Medical Superintendent Arrest
Chatrapati Sambhajinagar Crime : बनावट कागदपत्रांनी ३५ लाखांचा गंडा

ही कारवाई ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे पार पडली. आरोपींकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दोघांविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांनी केले असून तपास पोलीस निरीक्षक संतोष तीगोटे करत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास तात्काळ तक्रार करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news