Sambhajinagar AC city bus : शहरवासीयांसाठी १७ सप्टेंबरपासून एसी सिटी बस

येत्या १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण
Sambhajinagar AC city bus
Sambhajinagar AC city buspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मुंबई, पुणे आणि नाशिकप्रमाणे आता छत्रपती संभाजीनगरकरांनाही एसी सिटी बसचा अनुभव घेता येणार आहे. त्यासाठी स्मार्टसिटी योजनेतून ३५ आणि पीएम ई बस सेवेतून २७ अशा ६१ नव्या ई बस महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. येत्या १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे आता नव्या वसाहतींमध्येही बससेवा उपलब्ध होईल, असे संकेत प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

शहरवासीयांना प्रवासी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने सहा वर्षांपूर्वी १०० डिझेल बसेस आणि ३५ ईबससाठी हैदराबादच्या ओलेक्ट्रा कंपनीशी करार केला होता. शंभर बस तर आल्या. मात्र, ३५ ई-बस मिळविण्यासाठी अगोदर स्मार्टसिटीला आणि त्यानंतर महापालिकेला सतत ओलेक्ट्रा कंपनीकडे पाठपुरावा करावा लागला. अखेर हा पाठपुरावा असता संपला असून महापालिकेला काही दिवसांपूर्वीच ३४ ई बस उपलब्ध झाल्या आहेत. यापूर्वी कंपनीने १ बस प्रयोगिकतत्त्वावर दिली होती.

Sambhajinagar AC city bus
EPS 95 higher pension : निवृत्त कर्मचाऱ्यांचा उच्च पेन्शन हक्क नाकारता येणार नाही

ओलेक्ट्रा कंपनीसोबतच पीएम योजनेतूनही छत्रपती संभाजीनगर महापालिकेला १०० ई एसी बस मंजूर झाल्या काही दिवसांपूर्वीच ३४ ई बस उपलब्ध झाल्या आहेत. यापूर्वी कंपनीने १ बस प्रयोगिकतत्त्वावर दिली होती.

ओलेक्ट्रा कंपनीसोबतच पीएम योजनेतूनही छत्रपती संभाजीनगर महापालिकेला १०० ई एसी बस मंजूर झाल्या पाठपुरवा सुरू होता. मात्र, आता शहरवासीयांची एसी सिटी बसमधून प्रवास करण्याची प्रतीक्षा संपली आहे. येत्या १७सप्टेंबरपासून या बसेस शहरातील रस्त्यांवर धावणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

नवे चार्जिंग स्टेशन

ओलेक्ट्रा कंपनीच्या ३५ बससाठी जाधववाडी येथे चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. पीएम ई-बस योजनेंतर्गत प्राप्त बससाठी नव्याने चार्जिंग स्टेशन तयार करण्याचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यास १५ दिवस लागणार असल्याचे असे सूत्रांनी सांगितले.

Sambhajinagar AC city bus
Chhatrapati Sambhajinagar Crime : २ वर्षांच्या मुलाला कडेवर घेत रेल्वेसमोर उडी मारून जीवन संपवले

नव्या मार्गाचा समावेश

सध्या डिझेलवर चालणाऱ्या जुन्या १०० बसेस विविध २५ मार्गावर सुरू आहेत. त्यात आता नव्या ई बसमुळे आणखी १० नव्या मार्गाची भर पडेल. लवकरच हे मार्ग निश्चत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पर्यटनासाठी नवी ई डबलडेकर घेण्यात येणार होती. परंतु, आता तो पर्याय रद्द करून नव्या ई बसमधूनच दोन बसेस पर्यटनासाठी राखीव ठेवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news