Chhatrapati Sambhajinagar Crime : २ वर्षांच्या मुलाला कडेवर घेत रेल्वेसमोर उडी मारून जीवन संपवले

रेल्वेस्थानकावर दोन तास शांत बसून राहिली
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर एक २६ वर्षीय महिला आपल्या दाेन वर्षांच्या मुलाला घेऊन शांतपणे बसली होती. मुलगा रडू नये म्हणून त्याच्या हातात चिप्सचे पॉकेट दिले. तिच्या मनातील घालमेल कोणालाच समजली नाही. शनिवारी(दि.५) दुपारी अडीच सुमारास जालन्याकडे जात असलेल्या तपोवन एक्स्प्रेससमोर मुलाला कडेवर घेत अचानक उडी मारली. आणि क्षणात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आपल्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन मुकुंदवाडी स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आली होती. त्यानंतर सुमारे दोन तास ती तेथेच बसून होती. महिला मात्र शांत बसून होती. तिच्या मनात नेमके काय सुरू होते, याची कल्पना आजूबाजूच्या प्रवाशांना आली नाही.

Crime News
Manoj Jarange Patil : सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही

दुपारी अडीचच्या सुमारास जालन्याच्या दिशेने जाणारी तपोवन एक्स्प्रेस मुकुंदवाडी स्थानकाकडे येत होती. रेल्वे जवळ येत असल्याचे दिसताच महिलेने अचानक आपल्या मुलाला कडेवर घेत धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. काही क्षणांतच घडलेल्या या घटनेने तेथील प्रवाशीही घाबरले. दरम्यान या घटनेची माहिती लोको पायलटने पुंडलिकनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले.

Crime News
Sudivya Kumar Sonu passes away: झारखंडचे कॅबिनेट मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

टॅटूवरून ओळख पटविण्याचे प्रयत्न

मृत महिलेची आणि तिच्या मुलाची अद्याप ओळख पटलेली नाही. महिलेच्या जवळ ओळख पटविणारे कोणतेही कागदपत्र आढळले नाही. मात्र, तिच्या हातावर बदामाच्या आकारात अक्षय असे नाव गोंदलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या खुणेच्या आधारे तसेच परिसरातील बेपत्ता व्यक्तींबाबत दाखल तक्रारी तपासून पोलिसांकडून मायलेकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस जमादार लखवाल करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news