Sambhaji Nagar News : घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप

बावनकुळे यांच्या निर्देशानुसार घरकुल धारकांना ५ ब्रास रेती मोफत देण्याच्या धोरणानुसार लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप
Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar News : घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपFile Photo
Published on
Updated on

Free sand distribution to Gharkul beneficiaries

कन्नड : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार घरकुल धारकांना ५ ब्रास रेती मोफत देण्याच्या धोरणानुसार तालुक्यातील शेलगाव येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ रेतीचे प्रत्यक्षात ट्रैकर भरून आमदार संजना जाधव यांच्या हस्ते तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.६) करण्यात आला.

Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar News : हजारो वारकऱ्यांनी घेतले नाथांचे दर्शन

लाभार्थ्यांना ज्याच्या त्याच्या तालुक्यातच रेती उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय आधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, व दोन्ही कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून वाळू धोरणानुसार घरकुल धारकांना ५ ब्रास रेती उपलब्ध करण्याचे नियोजन केले.

Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar News : महापालिका लवकरच काढणार ई-डबलडेकर बससाठी निविदा

यावेळी बोलताना आमदार संजना म्हणाल्या की, गोरगरीब घरकुल धारकांना मोफत रेती देणे हा शासनाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून सर्व घरकुल धारकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आ. जाधव यांनी केले. यावेळी सरपंच विलास मनगटे व परिसरातील सरपंच उपसरपंच, घरकुल लाभार्थी शिव-सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news