Safari Park : मिटमिटा येथील सफारी पार्क दिवाळीपासून होणार खुले

स्मार्टसिटी योजनेचे २५० कोटी रुपये खर्चुन मिटमिटा येथे उभारण्यात येत असलेल्या सफारी पार्कचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
Safari Park : मिटमिटा येथील सफारी पार्क दिवाळीपासून होणार खुले
Published on
Updated on

Safari Park: Safari Park at Mitmita to open from Diwali

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा स्मार्टसिटी योजनेचे २५० कोटी रुपये खर्चुन मिटमिटा येथे उभारण्यात येत असलेल्या सफारी पार्कचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. वृक्षारोपण आणि इतर छोटी, मोठी कामे येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावेत, तसेच जुलैमध्ये प्राणी स्थलांतर करण्यासाठी सेंट्रल झू आथॉरिटीला अर्ज करण्यासोबतच दिवाळीपर्यंत सफारी पार्कच्या लोर्कापणाची तयारी करा, असे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले.

Safari Park : मिटमिटा येथील सफारी पार्क दिवाळीपासून होणार खुले
Sahyadri Devrai Project | झाडांचा अनाथाश्रम..!

सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालय मिटमिटा येथे असले शिफ्ट करण्याच्या दृष्टीने आतापासून हालचालींना वेग आला आहे. दिवाळीत सफारी पार्क सुरू होणार तरी आतापासूनच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकारणाकडे प्राण्यांच्या स्थलांतराच्या मंजुरीस्तव अर्ज करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महापालिका येत्या जुलै महिन्यात अर्जाची प्रक्रिया करणार आहे. या अर्जानंतर प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी पार्कची

पाहणी करतील. प्राणी स्थलांतरित करण्यासाठी पुरेसे नैसर्गिक वातावरण आहे का? याची शहनिशा करतील. त्यानंतरच स्थलांतरास परवानगी मिळेल. त्यामुळे अंतिम टप्प्यातील सर्व तयारी महापालिका उद्यान विभागाचे प्रमुख विजय पाटील यांनी सुरू केली आहे. शहराच्या पर्यटनात भर पाडणाऱ्या सफारी पार्कचे काम सध्या अंतिम टप्प्यान आले आहे.

या कामाचा शनिवारी महापालिका आयुक अमोल येडगे यांनी अतिशय बारकाईने आढावा घेतल त्यांनी दीड तास विविध कामांची पाहणी केली. प्रत्येक प्राण्याच्या पिंजऱ्याजवळ हे झाड लावण्याबाबतच तयारी, सफारी पार्कमध्ये किती झाड असतील, यापासून तर त्याच्या नियोजनापर्यंत सर्वच कामाची माहित त्यांनी जाणून घेतली. या ठिकाणी जलकुं उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम जुलैपर्यंत पूर्ण व्हावे सप्टेंबरपर्यंत पूर्ण कामे व्हावीत अशी सूचना आयुक्तांन केली. यावेळी उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्यासम अन्य अधिकारी उपस्थित होते.

Safari Park : मिटमिटा येथील सफारी पार्क दिवाळीपासून होणार खुले
Chhatrapati Sambhajinagar Smart City Projects : स्मार्ट सिटीच्या अपूर्ण प्रकल्पांच्या ३५ कोटींचा महापालिकेवर भार

सिद्धार्थमध्ये अडीचशे प्राणी

सध्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात लहान-मोठे सुमारे २५० प्राणी आहेत. याशिवाय महापालिकेला सफारी पार्कसाठी आणखी विविध प्राण्यांची आवश्यकता आहे. ते प्राणी मिळविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी प्रशासन केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला विनंती करणार आहे.

५६ हजार झाडे लावणार

पावसाळा सुरू झाला तरी अद्याप पाऊस मोठ्याप्रमाणात सुरू झालेला नाही. त्यामुळे सफारी पार्कमधील वृक्षारोपण संथ गतीने सुरू आहे. पुण्याहून खास २५ ते ३० फूट उंच दीडशेहून अधिक झाडे आणून लावली जाणार आहे. ५६ हजार झाडे लावण्याचे नियोजन असून, आतापर्यंत मनपाने १५ हजार झाडे लावली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news