Crime News : विश्वासघाताने गळा आवळून लुटले; पण पोलिसांनी परत मिळवून दिले साडेपाच तोळे सोने

पुंडलिकनगर पोलिसांची कारवाई; आजींना अश्रू अनावर
6 tola gold robbery |
6 tola gold robbery | हातपाय बांधून पिस्तूलने धमकावले; सांगरुळात सराफाचे 6 तोळे सोने लुटलेFile Photo
Published on
Updated on

Robbed by strangulation after a breach of trust; police recovered 5.5 tolas of gold

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शिवाजीनगर भागात एका ६४ वर्षीय एकाकी वृद्धेच्या घरात विश्वासाने घुसून, तिचा गळा आवळत जबरी चोरी केल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. या गुन्ह्यात पुंडलिकनगर पोलिसांनी तपास करत जप्त केलेले तब्बल साडेपाच तोळे सोने न्यायालयाच्या आदेशावरून फिर्यादी आजीबाईंना सुखरूप परत केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंढे यांनी दिली. हरवलेली आयुष्याची पुंजी आणि हक्काचे दागिने पुन्हा हाती पडताच या आजीबाईंना अश्रू अनावर झाले.

6 tola gold robbery |
Crime News : धक्कादायक : घराच्या मालकी हक्कावरून पोटच्या मुलानेच बापाचा काटा काढला

पतीच्या निधनानंतर फिर्यादी सुनंदा अशोकराव देवरे (६४, रा. शिवाजीनगर, १२ वी योजना) या घरात एकट्याच राहतात. त्यांच्या परिचयाचा असलेला रिक्षाचालक आकाश अंभोरे याने फेब्रुवारी महिन्यात पाणी मागण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. देवरे या घरात पाणी आणण्यासाठी वळताच, आरोपीने मागून त्यांचा गळा आवळून साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने हिसकावले आणि तिथून पोबारा केला होता.

6 tola gold robbery |
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

या गुन्ह्यात उपनिरीक्षक विनोद भालेराव व हवालदार गिरीश कागदे यांच्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकत सर्व मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने हे सोने सुनंदा देवरे यांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले. आपले गेलेले दागिने परत मिळाल्याने भावुक झालेल्या देवरे यांनी निरीक्षक राजेंद्र मुंढे, उपनिरीक्षक भालेराव आणि हवालदार कागदे यांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news