Accident News : वाहनाच्या धडकेत रिक्षा दरीत कोसळली

दोघांचा मृत्यू, सारोळा जवळील घटना
Accident News
Accident News : वाहनाच्या धडकेत रिक्षा दरीत कोसळलीfile photo
Published on
Updated on

Rickshaw falls into ravine after being hit by vehicle

फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा चौका जवळील सारोळा अभयारण्यात काही जण रिक्षाने फिरण्यास गेले होते. परत येत असताना या रिक्षास मागून अज्ञान वाहनाने जोराची धडक दिल्याने रिक्षाचालकाचा ताबा सुटला व रिक्षा खोल दरीत कोसळली. यात दोन जणांचा मुत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि.१९) रात्री १०.३० च्या सुमारास घडली.

Accident News
Sambhajinagar road accident : पैठण -संभाजीनगर मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

गौतम पाईकडे हरिभाऊ गाडेकर हरीभाऊ किसन गाडेकर (५८, रा. हडको) व गौतम लक्ष्मण पाईकडे (६०, रा. दीक्षाभूमी, हर्सल) या दोघांचा यात मृत्यू झाला. अलका गौतम पाईकडे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

सारोळा येथे हे सर्व जण जेवण करण्यास गेले होते. जेवण आटोपून हे सर्व जण रिक्षाने रात्री १०.३० सुमारास परत निघाले असता सारोळा रस्त्यावरील कोहिनूर महाविद्यालयाजवळ या रिक्षास अज्ञात वाहनाने मागून जोराची धडक दिली. यात रिक्षाचालकाचा ताबा सुटला व ही रिक्षा २० ते २५ फूट खोल दरीत कोसळली.

Accident News
Sambhajinagar road accident : वाहनाची वाट पाहत बसलेल्या महिलांना भरधाव कारने चिरडले

मोठा आवाज झाल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्वरित जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात हरिभाऊ गाडेकर व गौतम पाईकडे या दोघांचा मुत्यू झाला. अलका पाईकडे यांच्यावर उपचार सुरु आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news