Sillod News : रिक्षाचालकांनी ई-रिक्षेचा पर्याय स्वीकारावा : आ. अब्दुल सत्तार

शहरातील प्रियदर्शनी चौकात एकता रिक्षा युनियनच्या टॅक्सी रिक्षा पॉइंटच्या नामफलकाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
Sillod News
Sillod News : रिक्षाचालकांनी ई-रिक्षेचा पर्याय स्वीकारावा : आ. अब्दुल सत्तारfile photo
Published on
Updated on

Rickshaw drivers should adopt the e-rickshaw option: MLA Abdul Sattar

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रियदर्शनी चौकात एकता रिक्षा युनियनच्या टॅक्सी रिक्षा पॉइंटच्या नामफलकाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रिक्षाचालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व रिक्षा व्यवसायाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.

Sillod News
Drought : कन्नडच्या दुष्काळावरून सोशल मीडियावर वादंग

रिक्षा व्यवसाय हा अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार असल्याचे सांगत, बदलत्या काळानुसार रिक्षाचालकांनी पारंपरिक रिक्षांसोबत ई-रिक्षेचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन आमदार सत्तार यांनी केले. ई-रिक्षा खरेदीसाठी बँकांकडून अर्थसहाय्य उपलब्ध असून, त्याचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे त्यांनी सांगितले. प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध व विश्वासार्ह सेवा देत शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Sillod News
Drought : दुष्काळी स्थितीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. मनोज राठोड, नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे संचालक माजी अध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नगरसेवक शेख बाबू भिकन, नंदकिशोर सहारे, शेख इम्रान गुड्डू, जुम्माखा पठाण, अकील वसईकर, मिर्झा चांदबेग तसेच टॅक्सी युनियनचे अध्यक्ष अक्रम कोतवाल, सचिव शेख बब्बू, उपाध्यक्ष सुनील लांडगे

कोषाध्यक्ष शमशेर कोतवाल यांच्यासह शेख पटेल, अक्रम पठाण, शेख भिकन, लूकमान सय्यद, नाजिम पठाण, फारुख शेख, इसाक पठाण, मुक्तार पठाण, सुनील शेंडे, शफिक सय्यद, शमशेर पठाण, आलेर पठाण, गौतम हिवराळे, हसन शेख आदी रिक्षाचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news