Sand Mafia : वाळूमाफियांवर महसूलचा बडगा

सिल्लोड तालुक्यात गेल्या काही काळापासून बिनधास्त सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अखेर महसूल प्रशासनाने करडी नजर टाकत ठोस कारवाईचा बडगा उगारला आहे.
Sand Mafia News
Sand Mafia : वाळूमाफियांवर महसूलचा बडगाfile photo
Published on
Updated on

Revenue department takes action against sand mafia

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :

सिल्लोड तालुक्यात गेल्या काही काळापासून बिनधास्त सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अखेर महसूल प्रशासनाने करडी नजर टाकत ठोस कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन दिवसांत सिल्लोड महसूल विभागाच्या विशेष पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल ९२२ ब्रासपेक्षा अधिक अवैध वाळू साठा जप्त केला असून, या साठ्याची अंदाजे किंमत २ कोटी ८३ लाख ३९ हजार २०० रुपये इतकी असल्याची माहिती तहसीलदार संजय देवरे यांनी दिली.

Sand Mafia News
क्लीन स्ट्रीट्स ॲप, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी लिंक करा

ही व्यापक कारवाई तहसीलदार संजय देवरे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे वाळूमाफियांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली असून, कायद्याचा धाक पुन्हा एकदा ठळकपणे जाणवू लागला आहे. नदीपात्रांचे रक्षण आणि गौण खनिज संपत्तीचे संरक्षण हा प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सिल्लोड शहरासह तालुक्यातील पूर्णा नदी, भवन, चिंचखेडा, केरहाळा, धानोरा आदी परिसरात चोरट्या मागनि वाळू उपसा व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. नदी पात्रात मोठमोठे खड्डे पडून पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळेच महसूल विभागाने आता शब्द नव्हे तर कृती या भूमिकेतून कडक पावले उचलली आहेत.

Sand Mafia News
तेरा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर अडीच कोटींचा बोजा

ही कारवाई म्हणजे केवळ सुरुवात असून, कायद्याच्या चौकटीत राहूनच व्यापार करा अन्यथा परिणाम भोगा, असा स्पष्ट इशारा महसूल प्रशासनाने वाळूमाफियांना दिला आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून अवैध वाळू उपशाविरुद्धची लढाई अधिक बळकट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विनापरवाना, अनधिकृत उत्खनन व साठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वाळू तस्करांची गय केली जाणार नाही. शहरासह तालुक्यातील कोणत्याही नदीपात्रात अवैध वाळू उपसा, साठा किंवा वाहतूक आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकाराची माहिती थेट माझ्याशी संपर्क साधून द्यावी.
संजय देवरे, तहसीलदार, सिल्लोड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news