Water Pipeline : २५०० च्या जलवाहिनीची दुरुस्ती सुरू

शुक्रवारपासून पुन्हा चाचणी, आता नक्षत्रवाडी दोन किमीवरच
Sambhajinagar Water Supply
Water Pipeline : २५०० च्या जलवाहिनीची दुरुस्ती सुरूFile Photo
Published on
Updated on

Repair work on the 2,500 mm water pipeline has begun

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेतून जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान टाकलेल्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी आता अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी या जलवाहिनीतून फारोळ्याच्या पुढे पाणी आल्यानंतर ढोरकीन येथे स्कोर व्हॉल्व्हची वेल्डिंग निखळली. त्यामुळे बुधवारी चाचणी बंद ठेवून दुरुस्ती कामाला सुरुवात करण्या आली असून, गुरुवारी वेल्डिंग करून येत्या शुक्रवारपासून पुन्हा चाचणी सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sambhajinagar Water Supply
मुख्य जलवाहिनीच्या वेल्डिंगचे काम संपले

शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेतून टाकण्यात येत असलेल्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून २३ मार्चपासून पाण्याची चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीदरम्यान दोन वेळा जलवाहिनीचे वेल्डिंग निखळण्याचा प्रकार घडला आहे. तर काही ठिकाणी स्कोर व्हॉल्व्हला गळती लागल्याचेही आढळले आहे. त्यामुळे १६ दिवसांच्या चाचणीत चार दिवस दुरुस्ती कामासाठी आतापर्यंत चाचणी बंद ठेवण्यात आली आहे. मात्र असे असतानाही या जलवाहिनीतून जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडी या ३९ पैकी ३६ किलोमीटरपर्यंत पाणी यशस्वीरीत्या दाखल झाले आहे.

Sambhajinagar Water Supply
मुख्य जलवाहिनी चाचणीचे पाणी पोहोचले फारोळ्यापर्यंत

दरम्यान, मंगळवारी झालेल्या चाचणीत पाणी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापासून केवळ २ किलोमीटर अंतरापर्यंत दाखल झाले होते. त्याच वेळी ढोरकीन येथे स्कोर व्हॉल्व्हची वेल्डिग निखळली. त्यातून मोठ्याप्रमाणात पाणी वाहून जात होते. हा प्रकार पाहून तातडीने जलवाहिनीची चाचणी थांबविण्यात आली. त्यानंतर लागलीच दुरुस्ती कामासाठी जलवाहिनीतील पाणी मातीचा गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बुधवारी सायंकाळपर्यंत हेच काम सुरू राहिले. त्यामुळे वेल्डिंगचे काम झाले नाही. आता गुरुवारी वेल्डिंगचे काम करून शुक्रवारी चाचणीला पुन्हा सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news