High Security Number Plate : नोंदणी एका क्रमांकासाठी, मिळाला दुसराच क्रमांक

हाय सिक्युरिटी नंबरप्लेटचा घोळ : वाहनधारक त्रस्त
High Security Number Plate
High Security Number Plate : नोंदणी एका क्रमांकासाठी, मिळाला दुसराच क्रमांकFile Photo
Published on
Updated on

Registered for one number, got another number

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा २०१९ पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी संबंधित कंपनीकडे ऑनलाईन बुकिंग करावी लागते. रिक्षाच्या क्रमांकासाठी एकाने ऑनलाईन बुकिंग केली खरी, परंतु त्याने ज्या क्रमांकाची बुकिंग केली होती, त्यापेक्षा वेगळाच क्रमांक दिल्याने रिक्षाचालकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. या विचित्र प्रकारामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसे वाहतूक सेनेने दिला आहे.

High Security Number Plate
Shri Sant Eknath Maharaj Palkhi : करकंब नगरी हरिनामाच्या गजरात दुमदुमली

अली शेख या रिक्षाचालकाने (एमएच-२० ईएफ-८४५८) या क्रमांकची ऑनलाईन नोंदणी १४ जून रोजी केली. त्यांना दहा ते पंधरा दिवसांनंतर नंबर प्लेट बनवून आली. पुढचा क्रमांक (एमएच-२० ईएफ ८४५८), तर मागील क्रमांक (एमएच-२० ईफ ८४५४) असा आला. विशेष म्हणजे दोन्ही नंबरप्लेट फीट करून रिक्षाचालकाने शहरात व्यवसायही केला. ही नंबर प्लेट सावरकर चौक येथील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सेंटरवर बनवण्यात आली.

रिक्षाचालकाची सेंटरवर धाव दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर रिक्षाचालकाने नंबर प्लेट सेंटरवर धाव घेत ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ही प्लेट बदलून देण्यासाठी आणखी आठ दिवसांनी येण्यास सांगितले.

High Security Number Plate
छ.संभाजीनगर : काळा गणपती मंदिरासमोर कारने पाच जणांना चिरडले ; 2 ठार, 4 जखमी

दरम्यान अशा चुका अनेक ठिकाणी झाल्याचा मनसेने आरोप केला असून, यात आरटीओ किंवा संबंधित प्रशासनाने लक्ष घालावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा संघटक जाकीर पठाण यांनी दिला आहे.

योग्य ती कारवाई करू असे प्रकार व्हायला नको. ही बाब गंभीर असून, संबंधित सेंटरचालकांना प्रथम समज देऊ. तसेच याची माहिती परिवहन कार्यालयाला कळवून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याबाबत अहवाल पाठवण्यात येईल. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरही योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news