Government Recruitment Examination System : भरती परीक्षा पद्धती सुधारणा उच्चस्तरीय समिती आज छत्रपती संभाजीनगरात

विद्यार्थी, व तज्ज्ञांशी साधणार संवाद
Government Recruitment Examination System
Government Recruitment Examination System : भरती परीक्षा पद्धती सुधारणा उच्चस्तरीय समिती आज छत्रपती संभाजीनगरातfile photo
Published on
Updated on

Recruitment Examination System Reform High Level Committee today in Chhatrapati Sambhaji Nagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गठित उच्चस्तरीय समिती सोमवारी (दि.२१) जिल्ह्यात येत आहे. सोमवारी सकाळी साडेदहाला शहरातील स्मार्ट सिटी कार्यालयात समिती विद्यार्थी, परीक्षार्थी व संबंधित घटकांना भेटून त्यांची मते जाणून घेणार आहे. या संदर्भात स्मार्ट सिटी कार्यालयात सर्व सज्जता करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज सर्व आढावा घेतला.

Government Recruitment Examination System
Students Protest : पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरात एल्गार

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सुधारणा, तसेच परीक्षा प्रक्रियेतील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत राज्यशासनाने गठीत केलेल्या भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती जिल्ह्यात दाखल होत आहे. अपर मुख्य सचिव व्ही. राधा ह्या समितीच्या अध्यक्ष आहेत.

Government Recruitment Examination System
JEE Main and Board exams : जेईई मेन अन् बोर्डाची तोंडी परीक्षा एकाच वेळी

तर वीरेंद्र सिंह, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डी. एन. रामास्वामी इ. समिती सदस्य आहेत. समिती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे परिक्षार्थी, अभ्यासिका चालक-मालक, शिक्षक तसेच परीक्षा पद्धतीबाबत सूचना मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांना भेटून चर्चा करणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात सकाळी साडेदहापासून सर्व संबंधित घटकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news