निखिल चव्हाण यांच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे यांची सभा

रविवार (दि.१) गणोरी गटातील भाजपाचे उमेदवार निखिल चव्हाण यांच्या प्रचारार्थ वारेगाव येथे दानवेची सभा घेण्यात आली
sambhajinagar news
निखिल चव्हाण यांच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे यांची सभाfile photo
Published on
Updated on

Raosaheb Danve's rally in support of Nikhil Chavan's campaign

फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा : डॉ. कल्याण काळे हे दोन वर्षांपासून खासदार आहेत. त्यांनी एखादे काम केल्याचे सांगावे. फुकटच्या वल्गना करू नये मुंबई संभाजीनगर नागपूर - रेल्वे कॉरिडोर अर्थसंकल्पात नामंजूर झाला. यावर डॉ. काळेंनी प्रश्नच मांडला नाही. हा प्रकल्प द्यायचा कशाकरिता म्हणून त्यास आजच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली नाही. माझ्या पराभवाचे नुकसान आज दिसून आले, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. ही सभा विजयी संकल्प सभा म्हणून आयोजित केली होती.

sambhajinagar news
अजिंठा घाटात ट्रक निकामी; १ कि.मी. पर्यंत वाहनांच्या रांगा

रविवार (दि.१) गणोरी गटातील भाजपाचे उमेदवार निखिल चव्हाण यांच्या प्रचारार्थ वारेगाव येथे दानवेची सभा घेण्यात आली, त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, नगरसेवक विजय औताडे, रामेश्वर भादवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाध्यक्ष सुचित बोरसे यांनी संचलन तर माजी पं.सं सदस्य एकनाथ धटिंग यांनी प्रास्ताविक केले. निखिल चव्हाण यांच्या विरोधातील काँग्रेचे उमेदवार संदीप बोरसे त्यांच्या वारेगावातच ही मोठी सभा झाली. गणोरी गटात निखिल चव्हाण तर गण ोरी गणात बाळासाहेब तांदळे, वानेगाव गणात सुजाता बनकर यांच्या प्रचारार्थ ही सभा होती. यात शेरोडी खु, पिंपळगाव वळण व शिरोडी बु. येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला या सर्वांचे रावसाहेब दानवे यांनी स्वागत केले.

याप्रसंगी विजय औताडे, सुहास शिरसाठ, निखिल चव्हाण, बाळासाहेब तांदळे, याची भाषणे झाली काँग्रेसचे कार्यकर्ते आजिनाथ भागवत, नाना साळुंके, संजय लहाने, अंकुश वाहटुळे, संतोष नरडवडे या प्रमुख आदींनी भाजपात प्रवेश केला. यावेळी साडू जाधव, इलियास शाह, नरेंद्र देशमुख, पंडितराव जाधव, बाळासाहेब सोटम, विकास कुलकर्णी, सुचित बोरसे, कल्याण चव्हाण, अशोक भोकरे, सोमनाथ ठेंगे, महेश जाधव, राहुल जाधव, गणेश बोरसे, बाबासाहेब बकाळ, संजय जाधव कय्युम पटेल, नाना जाधव, शिवाजी धटिंग, पुंडलिक जाधव यांच्यासह आदींची उपस्थित होती.

sambhajinagar news
निवडणूक काळात गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार कारवाई

तुलना करा निर्णय घ्या

आ. अनुराधा चव्हाण यांनी सांगितले की काँग्रेस-भाजपाच्या कामाची तुलना करा व मतदानाचा निर्णय घ्या. राज्य व केंद्र शासनाचा निधी जि.प. ला असतो, त्यामुळे विकासाचे स्थान हे जिल्हा परिषद आहे. तसेच दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असून, खोटे अश्वासने व खोटे भूमिजन करणारे काँग्रेसचे नेत आहेत यासाठी भाजपलाच मतदान करा, असे आ. चव्हाण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news