Chhatrapati Sambhajinagar Crime News: सिमेंटच्या गट्टूने डोके ठेचून कामगाराचा खून; रांजणगाव फाटा येथील घटना

वाळूज महानगर परिसरात पुन्हा नशेखोरी उफाळली असून, रांजणगाव फाटा येथील एका बंद कंपनीच्या आवारात कामगाराचा सिमेंटच्या गट्टूने डोके ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
रांजणगाव येथे घटनेची वार्ता परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
रांजणगाव येथे घटनेची वार्ता परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar Crime News

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात पुन्हा नशेखोरी उफाळली असून, रांजणगाव फाटा येथील एका बंद कंपनीच्या आवारात ३० ते ३२ वर्षीय कामगाराचा अज्ञात मारेकऱ्यांनी सिमेंटच्या गट्टूने डोके ठेचून खून केल्याची घटना आज मंगळवारी (दि. १६) सकाळी उघडकीस आली. प्रवीण उर्फ पऱ्या असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो रांजणगाव फाटा परिसरात राहून वाळूज एमआयडीसीत हमाली तसेच मिळेल ते काम करत असे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव फाट्यावर भारत पेट्रोलियम पंपासमोर प्रेम इंटरप्रायजेस (सेक्टर ई-१२) नावाची कंपनी आहे. ही कंपनी काही महिन्यांपासून बंद असल्याने या ठिकाणी मद्यपी तसेच नशेखोरांचा उपद्रव सुरू असतो. आज मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास पोलिसांना या कंपनीच्या आवारात एक जण बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाली होती.

रांजणगाव येथे घटनेची वार्ता परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
Chhatrapati Sambhajinagar airport|औद्योगिक विकास सुसाट, पण हवाई कनेक्टिव्हिटी सुस्तच

पोलिस उपनिरीक्षक गुसिंगे तसेच ११२ वर कर्तव्य बजावत असलेले पोलिस अंमलदार सुरेश भिसे आणि हनुमान ठोके यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना या बंद कंपनीच्या आवारात अंदाजे ३० ते ३२ वयोगटातील एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला. सिमेंटच्या गट्टूने त्याचे डोके ठेचण्यात आले होते.

हा घातपाताचा प्रकार लक्षात येताच त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानुसार पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त शेख मजहर, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे आणि संजय गीते, पोलिस उपनिरीक्षक संजय जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, फॉरेन्सिक तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

खून झालेल्या तरुणाचे नाव प्रवीण उर्फ पऱ्या असे सांगण्यात येत असून, त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. रांजणगाव फाटा परिसरात राहून तो वाळूज एमआयडीसीत मिळेल ते काम करत असे. रात्री त्याने ज्या मित्रासोबत दारूचे सेवन केले होते, त्या मित्राला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे.

रांजणगाव येथे घटनेची वार्ता परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
Chhatrapati Sambhajinagar Bakwalnagar house burglaries|दिवाळीसाठी गावी गेलेल्या कामगारांची पाच घरे फोडली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.