Chhatrapati Sambhajinagar Ganesh Temple : ऐन गणेशोत्सवात संस्थान गणपतीसमोर ड्रेनेजचे पाणी

राजाबाजारात घाण पाण्याचे पाट; मनपाकडून दुरुस्ती
Chhatrapati Sambhajinagar Ganesh Temple
Chhatrapati Sambhajinagar Municipal CorporationFile Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या काळात शहराचे ग्रामदैवत असलेल्या राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरासमोरच ड्रेनेजलाइन फुटल्याने रस्त्यावरून घाण पाण्याचे पाट वाहत होते. दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढत भाविकांना मंदिरात जावे लागत असल्याने गणेशभक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तर मंदिरासमोर दररोज होणाऱ्या अथर्वशीर्ष पठणासाठी येणाऱ्या भाविकांनाही या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागला. तक्रार मिळताच महापालिका प्रशासनाने तातडीने ड्रेनेजलाइनची दुरुस्ती केली.

गणेशोत्सवामुळे शहरातील विविध मंदिरांसह गणेश मंडळांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. राजाबाजार येथील शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरातही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे. दररोज सकाळी मंदिरासमोर अथर्वशीर्ष पठण आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यामुळे सकाळच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, मंदिरासमोरच ड्रेनेजलाइन फुटल्याने सांडपाणी रस्त्यावर पसरले.

Chhatrapati Sambhajinagar Ganesh Temple
Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यातील ८०० गावं डेंजर झोनमध्ये

घाण पाण्यातूनच भाविकांना मंदिरात प्रवेश करावा लागत होता. परिसरात दुर्गंधी पसरल्याने अथर्वशीर्ष पठणासाठी आलेल्या भाविकांचीही गैरसोय झाली. ऐन गणेशोत्सवात मंदिरासमोरच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, ड्रेनेजलाइन फुटल्याची माहिती मिळताच संस्थान गणपतीच्या विश्वस्तांनी मनपा झोन क्रमांक २ कार्यालयाचे सहायक आयुक्त रमेश मोरे यांच्याकडे तक्रार केली.

मोरे यांनी तातडीने झोनच्या उपअभियंत्यांना सूचना देत दुरुस्तीचे काम करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ड्रेनेजलाइनची दुरुस्ती गणेशोत्सवाच्या काळात संस्थान केली. गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने परिसरातील स्वच्छता आणि मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Ganesh Temple
Alzheimer's disease : ६० वर्षांवरील ८ टक्के ज्येष्ठांना अल्झायमरचा त्रास

भक्तीच्या ठिकाणी दुर्गंधीचा त्रास

संस्थान गणपतीसमोर ड्रेनेजलाइन फुटल्याने रस्त्यावर सांडपाणी वाहत होते. अथर्वशीर्ष पठणासाठी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्याच पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याने गणेशभक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news