रेल्वे : तिकीट तपासणीची धडक मोहीम

एकाच दिवसात ५०० फुकट्यांवर कारवाई : ३.४२ लाख वसूल
Railway News
रेल्वे : तिकीट तपासणीची धडक मोहीमfile photo
Published on
Updated on

Railways: Ticket checking drive underway

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेत फुकट्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट असतो. ही बाब गांभीर्याने घेत प्रशासनाने यावर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवणे सुरू केले आहे. या विशेष मोहिमेत २६ मार्च रोजी एकाच दिवसात सुमारे ५०० जणांवर कारवाई करत ३ लाख ४२ हजार रुपयांची दंडासह रक्कम वसूल केली.

Railway News
MLA Kailas Patil : कर्ज मर्यादा अंतिम टप्प्यावर; राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे

या विशेष मोहिमेत २८ तिकीट तपासणी कर्मचारी सहभागी झाले होते. विविध मार्गावरील २५ गाड्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवास, अनियमित प्रवास तसेच अनबुक्ड सामान अशी ५०० प्रकरणे आढळून आली.

यांच्यावर रेल्वे नियमानुसार कारवाई करण्यात आली. यात ४४९ विनातिकीट, १५ अनियमित प्रवास, तसेच ३६ अनबुक्ड लगेज अशा एका दिवसात ५०० जणांकडून ३ लाख ४२ हजार ५८० रुपयांची दंडासहित रक्कम वसूल केली आहे.

Railway News
Railway News : एकाच महिन्यात २१ हजार फुकट्यांवर रेल्वेची कारवाई

प्रवाशांना आवाहन

सर्व प्रवाशांनी वैध तिकिटासह प्रवास करावा. तसेच प्रवासादरम्यान सोबत असलेले साहित्य नियमानुसार बुक करावे. विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणे हे रेल्वे कायद्यांतर्गत दंडनीय अपराध आहे. ही कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news