Abortion Center Raid : सातारा परिसरातील बेकायदा चालणाऱ्या गर्भपात केंद्रावर छापा

आरोपीसह रुग्णाचा पती अटकेत आरोग्य विभाग, पोलिसांची संयुक्त कारवाई, मुख्य सूत्रधार नर्स फरार
sambhajinagar news
सातारा परिसरातील बेकायदा चालणाऱ्या गर्भपात केंद्रावर छापाfile photo
Published on
Updated on

Raid on an Illegally Operating Abortion Center in the Satara Region

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

शहरातील सातारा परिसरात घरातूनच बेकायदेशीर गर्भपात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साईनगर भागातील एका घरावर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रविवार (दि.५) छापा टाकत दोन महिलांना प्रत्यक्ष गर्भपात करताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

sambhajinagar news
Partur Crime| परतूर हादरले; नवजात अर्भक प्रकरणात धक्कादायक खुलासा

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सातारा परिसरातील साईनगरमधील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेसमोरील छाया बाबासाहेब जाधव (५५) यांच्या घरात हे बेकायदेशीर केंद्र सुरू होते. त्यांची मुलगी वर्षा बाबासाहेब जाधव (३०) आणि ऊर्मिला विठ्ठलराव गायकवाड (३२) या दोघी बहिणी मिळून अवैध गर्भपात केंद्र चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

एका डॉक्टराच्या माध्यमातून हा गर्भपाताचा अड्डा चालविल्याचे समोर आले. मात्र संबंधित डॉक्टरची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, या प्रकारणाची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी मनपाच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधत संयुक्त पथक तयार केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. अमर ज्योती शिंदे, डॉ. सुनील पाटील, विधी सल्लागार रश्मी शिंदे तसेच पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक निर्मला राख, गोविंद एकिलवाले, नंदकुमार भंडारे यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.

sambhajinagar news
Abortion Racket : यूट्यूबवर शिकला लिंगनिदान; वॉर्डबॉय चालवत होता गर्भपात रॅकेट

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने गर्भ तपासणी करून मुलगी असल्यास गर्भपात केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात रुग्णांच्या नातेवाइकांची संमती घेऊन औषध देणे आणि त्यानंतर इंजेक्शनद्वारे प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचेही उघड झाले आहे.

रुग्णाचा पती अटकेत

या प्रकरणातील रुग्णाचा पती रामदास माणिकराव घोडे (३३) याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. तो सिल्लोड तालुक्यातील असून, या प्रकरणात त्याची भूमिका संशयास्पद असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

मुख्य सूत्रधार पसार

या संपूर्ण रॅकेटमागे जीएनएमचे शिक्षण घेतलेली नर्स ज्योती भीमराव पवार (३०) हिचा हात असल्याचे उघड झाले असून, ती सध्या फरार आहे. ख्वाजा टेकडी परिसरातील साई विश्व सोसायटीत राहणाऱ्या या महिलेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news