

Public awareness and timely treatment are the only effective measures to prevent snakebites
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात 'आंतरराष्ट्रीय सर्पदंश जनजागृती दिना' निमित्त सर्पदंश प्रतिबंध, योग्य प्रथमोपचार आणि वेळेत वैद्यकीय उपचाराबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. सर्पदंश हा गंभीर सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्न असून, वेळेत योग्य उपचार मिळाल्यास गंभीर गुंतागुंत व मृत्यूचा धोका कमी करण्यास मदत होते.
आरोग्य विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार २०२५-२६ मध्ये २६, तर २०२६ मध्ये आतापर्यंत ३९ सर्पदंश प्रकरणांची नोंद झाली आहे. अशा प्रकारे संबंधित कालावधीत एकूण ६५ सर्पदंश प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्तरापासून सर्पदंश प्रतिबंध आणि तातडीच्या उपचाराबाबत जनजागृतीवर विशेष भर देण्यात आंतरराष्टीय सर्पदंश जनजाग येत आहे. १९ सप्टेंबर दरवर्षी १९ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सर्पदंश जनजागृती दिन पाळला जाते. यावर्षीची थीम्हर्स अँड रेस्क्युअर्सः चॅम्पियन्स फॉर चेंज असून, सर्पदंशातून बचावलेल्या व्यक्ती आणि अधिकृतरीत्या मान्यताप्राप्त सर्पमित्रांना कम्युनिटी चॅम्पियन्स म्हणून जनजागृतीमध्ये सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.
सर्पदंश वैद्यकीय आपत्कालीन स्थिती
शेतकरी, कृषी कामगार, वन व वन्यजीव कर्मचारी, बांधकाम कामगार, स्वच्छता कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामपंचायती, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, विविध घटकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. शिक्षक, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे व समुदायातील आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वृद्धी सर्पदंशाचे लवकर निदान, योग्य व्यवस्थापन, एएसव्हीचा योग्य वापर, गुंतागुंतांचे व्यवस्थापन आणि वेळेत रेफरल याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात आला.
सर्पदंश झाल्यास काय करावे ?
रुग्णाला शांत ठेवावे.
विलंब न करता जवळच्या योग्य आरोग्य संस्थेत घेऊन जावे.
आवश्यकतेनुसार आरोग्य संस्थेत एएसव्ही व सहायक उपचार उपलब्ध करून दिले जातात.
सर्पदंशाच्या ठिकाणी कापाकापी करू नये.
विष शोषण्याचा प्रयत्न करू नये.
घट्ट बांधू नये.
अंधश्रद्धा व घरगुती उपचारांमध्ये वेळ वाया घालवू नये.